Pavneet Kaur IAS | सार्वजनिक स्वच्छते बाबत अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर यांची दिलासादायक भूमिका | पदभार हाती घेताच सुट्टी असूनही खात्या सोबत ४ तास बैठक घेत केल्या विविध सूचना
PMC Solid Waste Management Department – (The Karbhari News Service) – घनकचरा व्यवस्थापन विभाग आता अतिरिक्त आयुक्त जनरल यांच्या नियंत्रणात आला आहे, जो पूर्वी इस्टेट च्या नियंत्रणात होता. दरम्यान पवनीत कौर यांनी नुकताच अतिरिक्त आयुक्त पदाचा पदभार हाती घेतला आहे. त्यांनी तत्काळ विविध खात्यांच्या बैठका घेणे सुरु केले आहे. सुट्टी असून देखील आज त्यांनी घनकचरा विभागाची बैठक घेतली. सार्वजनिक स्वच्छते बाबत त्यांची दिलासादायक भूमिका दिसून आली. खात्या सोबत ४ तास बैठक घेत त्यांनी खात्याला विविध सूचना केल्या. (Pune Municipal Corporation – PMC)
या बैठकीकरीता संदीप कदम, उपायुक्त घनकचरा व्यवस्थापन, सर्व परिमंडळ कार्यालयाकडील मुख्य आरोग्य निरीक्षक, खात्याकडील सर्व मुख्य अभियंता वर्ग, आरोग्य निरीक्षक व सल्लागार समितीचे सदस्य इ. उपस्थित होते.
बैठकीत त्यांनी शहरातील कच-याचे क्रोनिक स्पॉटचे सर्वे करणे व पुढील एक महिन्यात सर्व क्रोनिक स्पॉट बंद करणेबाबत सूचित केले. तसेच शहरातील BWG यांची तपासणी करून ओला कचरा जागचे जागेवर जिरवणेबाबत कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. तसेच शहरात दर महिन्याच्या एक तारखेला डीप क्लीन ड्राईव्ह आयोजित करण्याच्या सूचना दिल्या. या बैठकी दरम्यान घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत चालणारे दैनंदिन कामकाज, प्रक्रिया प्रकल्पांचे सविस्तर कामकाज, दंडात्मक कारवाई, नागरिक तक्रार निवारण यंत्रणा, रात्रपाळीतील कामकाज या सर्व बाबींचे अनुषंगाने सविस्तर माहिती देऊन चर्चा करण्यात आली.
बैठकीत अतिरिक्त महापालिका आयुक्त (ज) यांनी खात्याची सविस्तर माहिती घेऊन शहराच्या सार्वजनिक स्वच्छतेच्या अनुषंगाने जास्तीत जास्त नागरिक सहभाग वाढविण्याचे नियोजन करण्यात आले. तसेच शहर स्वच्छतेच्या अनुषंगाने नागरिक स्वयंसेवा संस्था, शाळा / महाविद्यालयीन विद्यार्थी यांस सहभागी करुन घेण्याचे देखील नियोजन करण्यात आले.
तसेच सर्व क्षेत्रीय कार्यालयामध्ये स्वच्छतेच्या कामकाजाच्या बाबतीत स्पर्धा घेण्याच्या सूचना देणेत आल्या. तसेच सोसायट्यांमध्येही घनकचरा व्यवस्थापनबाबत चांगले कामकाजबाबत स्पर्धा आयोजित करण्याबाबत सुचविण्यात आले.
तसेच, कर्मचार- यामध्ये प्रोत्साहन निमार्ण होण्यासाठी चांगले काम करणा-या कर्मचा-यांना बक्षीस / इंक्रीमेंट इत्यादी बाबत सूचना देण्यात आल्या. तसेच शहातील स्वच्छतेबाबत जनजागृतीसाठी सर्व घटकांची जसे की कॉलेज विद्यार्थी सर्व प्रमुख आरोग्य निरीक्षक, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक, मोकादम, सर्व NGO, बिल्डर असोसिएशन, स्टेक होल्डर्स, हॉटेल असोसिएशन सर्व सोसायटी पदधिकारी इत्यादी यांची बैठक घेण्याच्या सूचना दिल्या. तसेच शहरातील सर्व कचरा हस्तांतर केंद्र बंदिस्त करणे बाबत सूचना दिल्या.

COMMENTS