PMC Solid Waste Management Department | स्वच्छ संस्थेच्या सेविकेने दिली स्वच्छतेची शपथ! | महापालिका आयुक्तांनी दिला सेविकेला सन्मान!
Swachhata Hi Seva 2025 – (The Karbhari News Service) – स्वच्छता ही सेवा- २०२५ अभियान अंतर्गत २५ सप्टेंबर ला ‘एक दिवस, एक तास, एक साथ श्रमदान कार्यक्रम महापालिका घनकचरा विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. यामध्ये महापालिका आयुक्त आणि इतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना स्वच्छ संस्थेच्या सेविकेन शपथ दिली. महापलिका आयुक्तांनी एका सेविकेला हा सन्मान दिल्यामुळे आयुक्तांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. महापालिका आयुक्त यांनी देखील या कार्यक्रमा बाबत खात्याचे कौतुक केले. (Pune PMC News)
राष्ट्रपिता महात्मा गांधीजींना त्यांच्या जयंती निमित्त आदरांजली अर्पण करण्यासाठी ०२ ऑक्टोबर हा दिवस स्वच्छ भारत दिवस म्हणून साजरा केला जातो. स्वच्छ भारतासाठी स्वयंप्रेरणा आणि सामूहिक कृतीला बळकटी देण्यासाठी सन २०१७ पासून वार्षिक स्वच्छता ही सेवा ( SHS) पंधरवडा साजरा केला जात आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त दिनांक १७ सप्टेंबर पासून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त दिनांक ०२ ऑक्टोबर पर्यंतच्या कालावधीमध्ये स्वच्छता पंधरवडा साजरा करण्यात येतो.
स्वच्छता ही सेवा २०२५ ‘एक दिवस एक तास एक साथ श्रमदान’ उपक्रमांतर्गत, घनकचरा व्यवस्थापन मुख्य खात्यामार्फत भिडे पूल ते ओमकारेश्वर मंदिर नदी पात्रात डीप क्लीन ड्राईव्ह सकाळी ७ ते ९ या वेळेत आयोजित करण्यात आला. अभियानांमध्ये नवल किशोर राम, महापालिका आयुक्त, पृथ्वीराज बी.पी., अतिरिक्त महापालिका आयुक्त (इ), एम. जे. प्रदीप चंद्रन अतिरिक्त महापालिका आयुक्त (जनरल), ओमप्रकाश दिवटे अतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष), संदिप कदम, उपायुक्त घनकचरा व्यवस्थापन कार्यालय, सुनील बल्लाळ उपायुक्त परिमंडळ क्र ५, श्रीमती प्रज्ञा पोतदार महापालिका सहाय्यक आयुक्त घनकचरा व्यवस्थापन कार्यालय, प्रकाश वालगुडे महापालिका सहाय्यक आयुक्त कसबा विश्रामबाग वाडा क्षेत्रिय कार्यालय, किसन दगडखैर महापालिका सहाय्यक आयुक्त भवानी पेठ क्षेत्रिय कार्यालय, तिमय्या जंगले महापालिका सहाय्यक आयुक्त शिवाजीनगर घोले रोड क्षेत्रीय कार्यालय, विक्रांत सिंग, अॅन्ड अॅम्बेसिडर व अपेक्स कमिटी सदस्य, कमिन्स इंडिया, आदर पूनावाला, जनवाणी, स्वच्छ पुणे सेवा सहकारी संस्था, ASGI हॉस्पिटल, वर्शिप अर्थ फौंडेशन या स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी तसेच एस.एन.डी.टी. कॉलेज, मॉर्डन. कॉलेज इ. महाविद्यालयांचे विद्यार्थी टीम हयुमन मॅट्रिक्स इ. एकूण १४५ सहभागी उपस्थित होते.
अभियानांमध्ये कसबा विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत भिडे पूल ते ओमकारेश्वर मंदिर नदी पात्रात ४ JCB, १० ग्रास कट्टर, ५ छोटा हत्ती, ४ कॉम्पेटर, तसेच ५०० हून अधिक Ngos, विद्यार्थी, अधिकारी व सफाई सेवक यांच्या द्वारे नदी पत्रात डीप क्लीन करण्यात आले या मध्ये २५ टन राडारोडा व १५ टन कचरा ( पावसामुळे वाहून आलेल्या चिंध्या, प्लास्टिक, लाकडे, काचा, इत्यादी) उचलण्यात आला.
तसेच घोले रोड क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत भिडे पूल डेक्कन ते सिद्धेश्वर- वृधेश्र्वर घाट नदी पात्रात 3 JCB, 3 ग्रास कट्टर, स्वच्छ आणि मनपा सेवक असे ४५ कर्मचारी उपस्थित होते. या मध्ये ८.५ टन राडारोडा व ५ टन (पावसामुळे वाहून आलेल्या चिंध्या, प्लास्टिक, लाकडे, काचा, इत्यादी) कचरा उचलण्यात आला.
तसेच १५ क्षेत्रिय कार्यालयांतर्गत विविध ठिकाणी स्वच्छता मोहिमांचे आयोजन, पथनाट्य, जनजागृतीपर रॅली, असे विविध उपक्रम राबविण्यात आले. या सर्व अभियानांमध्ये क्षेत्रिय कार्यालयाकडील महापालिका सहाय्यक आयुक्त, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक, आरोग्य निरीक्षक, मोकादम, सफाई सेवक यांचे सह विविध स्वयंसेवी संस्था, शाळा/महाविद्यालये, खाजगी संस्था यांनी देखील सक्रीय सहभाग घेतला. भिडे पूल कसबा नदी पात्र येथील व १५ क्षेत्रिय कार्यालयांतर्गत आयोजित विविध उपक्रमांत एकूण २८०० सहभागींनी सहभाग नोंदविला. तसेच स्वच्छता अभियानांतर्गत एकूण १८.५ टन सुका कचरा, १४.५ टन ओला कचरा व १७ टन राडारोडा संकलित करण्यात आला.
एकूण संपूर्ण स्वच्छता अभियानांतर्गत २८.५ टन सुका कचरा, २४.५ टन ओला कचरा व ४०.४ टन राडारोडा संकलित करण्यात आला व एकूण ३३०० सहभागींनी सहभाग घेतला
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन उपायुक्त संदीप कदम यांनी केले.

COMMENTS