PMC SDD | महापालिका समाज विकास विभागाच्या वतीने महिला उदयोजिकांचा औद्योगिक महोत्सव संपन्न!
Women’s Day – (The Karbhari News Service) – महापालिका आयुक्त डॉ राजेंद्र भोसले (Dr Rajendra Bhosale IAS) आणि अतिरिक्त आयुक्त पृथ्विराज बी. पी. (Prithviraj B P IAS) यांच्या मार्गदर्शनाखाली व अनेक नागरिक स्टॉलधारक उपस्थितीत जागतिक महिला दिन’ 8 मार्च निमित्त (International Women’s Day) पुणे महानगरपालिकेतर्फे (Pune Municipal Corporation – PMC) औद्योगिक उत्पादन करणाऱ्या महिला उद्योजकांच्या औद्योगिक उत्पादनाचे महिला बचत गटांच्या उत्पादनाचे प्रदर्शन, सिंहगड इंडस्ट्रिअल असोसिअशन यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आले होते. ७ ते ९ मार्च कालावधीत हा महोत्सव घेण्यात आला. (Pune PMC News)
प्रदर्शनाच्या उद्घाटक प्रसंगी खासदार प्रा. मेधाताई कुलकर्णी व राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपालीताई चाकणकर उपस्थित होत्या. उद्योग जगतातील डॉ. जितेंद्र जोशी फाउंडर व इलोबल सेस इंडिया विजिनेस फोरम, अभी ग्रुप ऑफ कंपनिचे शेषगिरीराव डायरेक्टर इंटलेक्स इलेट्रॉनिक्स डॉ. संजयकुमार भोसले माजी संचालक साखर श्री व सौ. संजय पवार क्विकदिल सातारा, सावनी गुप्ता केम इलेक्ट्रॉनिक्स ए. जी.एम. ए. सी. ई. तसेच सिंहगड इंडस्ट्रिअल असोशिअशनचे पदाधिकारी पुणे मनपा समाज विकास विभागाचे उपायुक्त श्री नितीन उदास, मुख्य समाज विकास अधिकारी श्री रामदास चव्हाण यांचेसह समाज विकास विभागाकडील अधिकारी कर्मचारी समुहसंघटीका उपस्थित होत्या.
मेधाताई कुलकर्णी’ यांनी समाज विकास विभाग व औद्योगिक क्षेत्रातील रोजगाराच्या रांधी याची माहिती बचत गटातील महीलानी होण्यासाठी सुरू केलेल्या अभिनव उपक्रमाचे कौतुक केले. तसेच जास्तीत जास्त कंपन्यांनी बचत गटातल्या महिलांना रोजगार स्वयंरोजगार व व्यवसाय संधी उपलब्ध करून द्यावी, असे सांगितले.
राज्य महिला आयोगाच्या रुपाली चाकणकर यांनी सांगितले की, औद्योगिक क्षेत्र व बचत गटातील महिला समन्वयासाठी असे उपक्रम वारंवार राबविले जावेत. त्याशिवाय महिला क्रांतिज्योती महिला संस्थेच्या वतिने पुढील वर्षात अनेक उपक्रम राबवणार असून महिलांनी आत्मनिर्भर व्हावे, यासाठी प्रयत्नशिल राहणार असे सांगितले.
बचत गट व कंपन्यांचे गुण ८६ स्टॉल होते. यावेळी
इलेक्ट्रॉनिक आणि इतर क्षेत्रातील रोजगाराच्या संधि बाबत विविध स्टॉलवर मार्गदर्शन करण्यात आले.
COMMENTS