Pune News | पुणे शहरात ढासळलेल्या कायदा व सुव्यवस्थेच्या विरोधात तीव्र निषेध आंदोलन
NCP-SCP – (The Karbhari News Service) – पुणे शहरात ढासळलेल्या कायदा व सुव्यवस्थेच्या विरोधात पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले.
याबाबत शहर अध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले, कधीकाळी महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी, विद्येचे माहेरघर, ऑक्सफर्ड ऑफ ईस्ट अशी आपल्या पुण्यनगरीची ओळख होती. मात्र, देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहमंत्री पदाचा कारभार गेल्यापासून आपले पुणे शहर हिंसेची राजधानी, दहशतीचे माहेरघर झाले आहे.
पोर्शे कार अपघात, कोयता गँग, दिवसाढवळ्या गोळीबार, चेन चोरी, बलात्कार, विनयभंग, अपघात, खून अशा गुन्ह्यांनी पुणे शहर सतत चर्चेत आहे. लहान लहान मुलांकडे पिस्तूल, कोयता असे हत्यार आढळून येत आहेत. छोट्या मोठ्या कारणांवरून शहरात खून होत आहेत, अमली पदार्थांचा सुळसुळाट झाला आहे. या परिस्थितीवर पोलीस प्रशासनाचे तथा गृहमंत्र्यांचे काहीही नियंत्रण राहिले नाही.
याचा तीव्र निषेध व्यक्त करण्यासाठी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले.या आंदोलनास माझ्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला संघटनेच्या प्रदेशाध्यक्ष श्रीमती रोहिणीताई खडसे, भारतीताई शेवाळे, स्वातीताई पोकळे, किशोर कांबळे, शेखर धावडे, पायल चव्हाण, वैशाली थोपटे, राहुल तुपेरे, मंजिरीताई घाडगे, गौरव जाधव, अभिजित बारावकर, प्रविण आल्हाट, रुपाली शेलार, कुशल मोरे, रचना ससाणे, प्रसाद कोद्रे व मोठ्या संखेने सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
अशा प्रकारची गुन्हेगारी वारंवार घडत राहिल्यास आमच्यासह सर्वसामान्य जनता रस्त्यावर उतरून चक्काजाम केल्याशिवाय राहणार नाही,यासंदर्भात केंद सरकार व राज्य सरकार यांच्या विरोधात पुणे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
COMMENTS