PMC SDD | दिव्यांग्याच्या खात्यात ११ कोटी रक्कम जमा | महापालिकेच्या विविध योजनांचा २९७९ लाभार्थ्यांना मिळाला लाभ!
PMC Social Development Department – (The Karbhari News Service) – पुणे महापालिका समाज विकास विभागाच्या वतीने दिव्यांगसाठी विविध योजना राबवल्या जातात. यातील काही योजनेचा लाभ २९७९ लाभार्थ्यांना देण्यात आला आहे. त्यानुसार या लाभार्थ्यांच्या खात्यात डीबीटी मार्फत ११ कोटी जमा करण्यात आले आहेत. अशी माहिती समाज विकास विभागाच्या वतीने देण्यात आली. (Pune Municipal Corporation – PMC)
समाज विकास विभागाच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार दिव्यांगांसाठी वार्षिक अर्थसहाय्य योजना राबविली जाते. यात विविध स्तर करण्यात आले आहेत. त्यानुसार त्याच्या अपंगत्वानुसार अर्थसहाय्य दिले जाते. या योजनेसाठी एकूण २५६२ लाभार्थी पात्र झाले होते. त्यानुसार त्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्यात आली. तसेच कृत्रिम अवयव घेण्यासाठी ३६३ लाभार्थ्यांना अर्थसहाय्य देण्यात आले. तर स्वयंरोजगार योजने अंतर्गत ५४ लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला. असे एकूण २९७९ लाभार्थ्यांना ११ कोटी इतकी रक्कम देण्यात आली. असे समाज विकास विभागाच्या वतीने सांगण्यात आले.

COMMENTS