PMC Retired Employees | अमर शिंदे, सूर्यकांत जमदाडे यांच्यासहित महापालिकेचे ३० कर्मचारी सेवानिवृत्त!

Homeadministrative

PMC Retired Employees | अमर शिंदे, सूर्यकांत जमदाडे यांच्यासहित महापालिकेचे ३० कर्मचारी सेवानिवृत्त!

Ganesh Kumar Mule Oct 01, 2024 1:11 PM

International Women’s Day | पी. एम. सी. एम्प्लॉईज युनियन आणि पुणे मनपा कडून विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन! | लकी ड्रॉ मध्ये पाच महिलांना मिळाली भेट 
PMC Chief Labour Officer | अखेर नितीन केंजळे यांची महापालिकेच्या मुख्य कामगार अधिकारी पदी पदोन्नतीने नियुक्ती 
Pune PMC News | पुणे महापालिकेत साजरा करण्यात आला आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन

PMC Retired Employees | अमर शिंदे, सूर्यकांत जमदाडे यांच्यासहित महापालिकेचे ३० कर्मचारी सेवानिवृत्त!

 

PMC Retired Employees – (The Karbhari News Service) – सप्टेंबर महिन्यात पुणे महापालिकेचे (Pune Municipal Corporation – PMC) ३९ कर्मचारी आणि अधिकारी सेवानिवृत्त झाले. यामध्ये अधीक्षक अभियंता अमर शिंदे, सूर्यकांत जमदाडे यांचा समावेश. या कर्मचाऱ्यांसाठी महानगपालिका कामगार कल्याण विभाग (PMC Labour Welfare Department) च्या वतीने सेवापूर्ती समारंभ आयोजित करण्यात आला होता. अशी माहिती मुख्य कामगार अधिकारी नितीन केंजळे यांनी दिली.  (PMC Pune)

या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून उप आयुक्त (विशेष)  प्रशांत ठोंबरे उपस्थित होते.   नितीन केंजळे, मुख्य कामगार अधिकारी (Nitin Kenjale PMC) यांनी कार्यक्रमाच्या प्रस्तावनेवर बोलताना सेवकांच्या भविष्यात मिळणाऱ्या रकमा, गुंतवणूक व नियोजन याची सविस्तर माहिती दिली व शुभेच्छा दिल्या.

तदनंतर अमर शिंदे, अधीक्षक अभियंता या सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना पुणे महानगरपालिकेने आम्हाला सर्व काही दिले आहे. महापालिकेच्या माध्यमातून आम्हाला शहरासाठी खूप चांगली कामे करता आली. महापालिकेचे ऋण आम्ही कधी विसरणार नाही असे मत त्यांनी व्यक्त केले. सूर्यकांत जमदाडे, उपअभियंता यांनी पुणे महानगरपालिकेकडून आम्हाला खूप शिकायला मिळाले महापालिकेने आम्हाला आईप्रमाणे सांभाळले असे मनोगत व्यक्त केले. विजय वांजळे, गवंडी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

 

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले प्रशांत ठोंबरे यांनी निवृत्त सेवकांना मार्गदशनपर बोलताना आपण आज सेवानिवृत्त होत नाहीत तर आपली दुसरी इनिंग सुरू होत आहे. आपण नेहमी कामात व्यस्त राहिले पाहिजे असे नमूद केले. प्रत्येकाने आपले आयुष्य नव्याने पुन्हा जगण्याची आवश्यकता आहे. असे नमूद करून सर्वाना भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

प्रमुख पाहुण्यांच्या मार्गदर्शनानंतर सर्व सेवानिवृत्त अधिकारी / कर्मचारी यांना शॉल व स्मृतिचिन्ह देवून गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अलका जोशी यांनी केले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0