PMC Retired Employees – महापालिका सहायक आयुक्त सुनिल मते, प्रकाश मोहिते यांच्यासहित ४० कर्मचारी सेवानिवृत्त!

Homeadministrative

PMC Retired Employees – महापालिका सहायक आयुक्त सुनिल मते, प्रकाश मोहिते यांच्यासहित ४० कर्मचारी सेवानिवृत्त!

Ganesh Kumar Mule Nov 29, 2024 9:32 PM

Eid-ul-Zuha | बुधवारच्या ऐवजी आता गुरुवारी सुट्टी! | राज्य सरकारकडून अधिसूचना जारी
CM Eknath Shinde | राज्यात ७५ हजार पदांची भरती करणार | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती
River revival project | टीका झाल्यानंतर महापालिकेला आली जाग

PMC Retired Employees – महापालिका सहायक आयुक्त सुनिल मते, प्रकाश मोहिते यांच्यासहित ४० कर्मचारी सेवानिवृत्त!

 

PMC Retired Employees – (The Karbhari News Service) – नोव्हेंबर, 2024 महिन्यात पुणे महापालिकेचे (Pune Municipal Corporation) 40 कर्मचारी आणि अधिकारी सेवानिवृत्त झाले. या कर्मचाऱ्यांसाठी महानगपालिका कामगार कल्याण विभाग (PMC Labour Welfare Department) च्या वतीने सेवापूर्ती समारंभ आयोजित करण्यात आला होता. (PMC Pune)

या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून उप आयुक्त,  राजीव नंदकर उपस्थित होते.  नितीन केंजळे, मुख्य कामगार अधिकारी (Nitin Kenjale PMC) यांनी कार्यक्रमाच्या प्रस्तावनेवर बोलताना सेवकांच्या भविष्यात मिळणाऱ्या रकमा, गुंतवणूक व नियोजन याची सविस्तर माहिती दिली व शुभेच्छा दिल्या. तदनंतर प्रकाश मोहिते व  सुनील मते, महापालिका सहायक आयुक्त, या सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले कि, पुणे महानगरपालिकेने आम्हाला सर्व काही दिले आहे. महापालिकेच्या माध्यमातून आम्हाला शहरासाठी खूप चांगली कामे करता आली. महापालिकेचे ऋण आम्ही कधी विसरणार नाही असे मत त्यांनी व्यक्त केले. सेवानिवृत्त संघाचे अध्यक्ष  जयंत पवार यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. (Pune Municipal Corporation – PMC)

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे राजीव नंदकर यांनी निवृत्त सेवकांना मार्गदशनपर बोलताना तुम्ही आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे, व्यायामासाठी किमान दोन तास वेळ दिला पाहिजे, जेणेकरून आपले आरोग्य सुदृढ होईल आपल्याला जीवनाचा आनंद उपभोगता येईल. तसेच आपण कमावलेली पुंजी व्यवस्थित रित्या वापरली गेली पाहिजे व्यवस्थित गुंतवणूक केली पाहिजे जेणेकरून आपले पुढील आयुष्य सुखाचे समृद्धीचे व आनंददायी होईल. आपण नेहमी कामात व्यस्त राहिले पाहिजे ,असे नमूद करून सर्वाना भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

प्रमुख पाहुण्यांच्या मार्गदर्शनानंतर सर्व सेवानिवृत्त अधिकारी / कर्मचारी यांना शॉल व स्मृतिचिन्ह देवून गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अलका जोशी यांनी केले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0