Sheetal Teli Ugale IAS | विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले यांनी केली पालखी महामार्गाची पाहणी

Homeadministrative

Sheetal Teli Ugale IAS | विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले यांनी केली पालखी महामार्गाची पाहणी

Ganesh Kumar Mule Jun 04, 2026 8:33 PM

Devendra Fadnavis | देवेंद्र फडणविसांना सागर बंगला मिळावा म्हणून आपण हे सरकार आणलं नाही | ध्येयाकडे जाताना काही तह करावे लागतात | अधिवेशनात काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
PMC Employees Union | विधी समितीने मान्य केलेल्या प्रस्तावाला लेखनिकी संवर्गातील २५०० कर्मचाऱ्यांचा विरोध! 
Pune Metro Service in Ganeshotsav | गणेश उत्सवात पुणे मेट्रोला मिळाले ३ कोटीहून अधिक उत्पन्न! | २ लाख हून अधिक प्रवाशांनी केला प्रवास

Sheetal Teli Ugale IAS | विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले यांनी केली पालखी महामार्गाची पाहणी

 

Aashadhi Wari 2026 – (The Karbhari News Service) –  आषाढी एकादशी यात्रा पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले यांनी श्री. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गाची पाहणी केली. (Pune News)

यावेळी जिल्हाधिकारी गजानन पाटील, उपायुक्त तुषार ठोंबरे यांच्यासह सर्व संबंधित उप विभागीय अधिकारी, उप विभागीय पोलीस अधिकारी, तहसीलदार, गट विकास अधिकारी आदी उपस्थित होते.

श्रीमती तेली-उगले म्हणाल्या, पालखी मार्गावरील रस्त्यांची स्थिती, स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, आरोग्य सुविधा, वाहतूक नियोजन तसेच वारकऱ्यांच्या सोयीसाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती संबंधित अधिकाऱ्यांकडून घेतली. पालखी सोहळा सुरळीत, सुरक्षित आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पडण्यासाठी आवश्यक बाबींची पूर्तता वेळेत करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

श्रीमती तेली-उगले यांनी आंळदी, देहू, हडपसर, सासवड, जेजुरी, वाल्हे, निरा येथील पालखी मार्गाची पाहणी करुन त्या पुढे सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील पालखी मार्गाची पाहणीकरिता मार्गस्थ झाल्या आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: