MLC Vikram Kakade | पुणे स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे विक्रम काकडे बिनविरोध! 

HomeBreaking News

MLC Vikram Kakade | पुणे स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे विक्रम काकडे बिनविरोध! 

Ganesh Kumar Mule Jun 04, 2026 7:09 PM

Gauri Ganpati Decoration Competition | पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आयोजित “उत्कृष्ठ सार्वजनिक गणेशोत्सव देखावे स्पर्धा” व “गौरी गणपती सजावट स्पर्धा २०२२”
NCP Vs Governor | Pune | काळे मन हेच भाजपचे अंतर्मन! | अशा घोषणा देत राष्ट्रवादीचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या विरोधात आंदोलन
Pune : NCP : Nawab Malik : पुणे राष्ट्रवादी कॉंग्रेस कडून भाजपचा निषेध 

MLC Vikram Kakade | पुणे स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे विक्रम काकडे बिनविरोध!

 

Pune News – (The Karbhari News Service) – पुणे स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून महाराष्ट्र विधान परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार विक्रम संजय काकडे बिनविरोध निवडून आले आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी तथा पुणे जिल्हाधिकारी गजानन पाटील  यांनी दि. ४ जून  रोजी याबतची अधिकृत घोषणा केली. (Pune Breaking News)

जनप्रतिनिधी कायदा १९५१ च्या कलम ५३(२) आणि निवडणूक संचालन नियम १९६१ च्या नियम १(१) नुसार फॉर्म २१A मध्ये ही घोषणा करण्यात आली. निवडणुकीसाठी अन्य कोणीही उमेदवार अर्ज दाखल न केल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली.

याच मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी आमदार सुनील टिंगरे यांनीही डमी अर्ज भरला होता. मात्र पक्षाने त्यांची समजूत काढल्यानंतर त्यांनी अर्ज मागे घेतल्याने काकडे यांचा मार्ग मोकळा झाला.

विक्रम संजय काकडे हे एरंडवणे, पुणे-४१०४ येथील रहिवासी आहेत. ५ डिसेंबर २०२ रोजी कार्यकाळ संपून निवृत्त होणाऱ्या विधान परिषद सदस्याच्या जागेसाठी ते निवडून आले आहेत.

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी काकडे यांची निवड वैध ठरवून त्यांना विधान परिषदेच्या उर्वरित कार्यकाळासाठी सदस्य म्हणून निवड झाल्याचे घोषित केले.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रायोजित असलेल्या काकडे यांच्या निवडीमुळे पक्षाला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये बळ मिळणार असल्याचे बोलले जात आहे.

 

| पुणे विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) उमेदवाराची माघार

पुणे विभाग विधान परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) यांच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला होता. मात्र, या निवडणुकीत कोणत्याही प्रकारचा घोडेबाजार होऊ नये, लोकशाही मूल्यांचे रक्षण व्हावे आणि निवडणूक प्रक्रियेची पवित्रता अबाधित राहावी या व्यापक भूमिकेतून पक्षाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या आदरणीय सुनेत्राताई अजित पवार यांच्या विनंतीला मान देत आणि आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही या निवडणुकीतून माघार घेत आहोत. लोकशाही प्रक्रियेवर आमचा पूर्ण विश्वास असून, राजकारणात मूल्याधिष्ठित भूमिका कायम ठेवण्याचा पक्षाचा प्रयत्न राहील. असे पक्षाचे शहर अध्यक्ष श्रीकांत पाटील यांनी सांगितले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: