Pune Breaking News | पुण्यात भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी 37 कोटींची तरतूद; तीन नवीन शेल्टर उभारणार

Homeadministrative

Pune Breaking News | पुण्यात भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी 37 कोटींची तरतूद; तीन नवीन शेल्टर उभारणार

Ganesh Kumar Mule May 22, 2026 8:43 PM

Sun city to warje Bridge | सनसिटी ते वारजे हा मुठा नदीवरील पूल मे अखेर चालू करण्याचे नियोजन | महापौर आणि प्रशासनाकडून पुलाच्या कामाची पाहणी 
Pune Metro | पुण्यात मेट्रोचे २०० किमीचे जाळे उभारणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | पुणे मेट्रो भवनचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन
Vikas Lawande News | विकास लवांडे यांच्यावरील हल्ल्याचा शरद पवार पक्षाकडून निषेध व्यक्त

Pune Breaking News | पुण्यात भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी 37 कोटींची तरतूद; तीन नवीन शेल्टर उभारणार

 

Pune Stray Dogs – (The Karbhari News Service) –  भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी पुणे महापालिकेने 2026-27 च्या अर्थसंकल्पात 37 कोटी  रुपयांची तरतूद केली आहे. महिला व बाल कल्याण समितीच्या ठरावावर प्रशासनाने दिलेल्या अभिप्रायात ही माहिती समोर आली आहे.  (Pune News)

नगरसेविका वैशाली बनकर आणि अमोल बालवाडकर यांनी याबाबत समिती समोर प्रस्ताव दिला होता. त्यात त्यांनी म्हटले होते की, भटक्या कुत्र्यांना प्रतिबंध करण्यासाठी बजेट मध्ये पुरेशी तरतूद केली जावी. त्यानुसार प्रशासनाने अभिप्राय सादर करत म्हटले आहे की आधीच तरतूद केलेली असल्याने नवीन तरतूद करण्याची आवश्यकता नाही.

कुत्रा व मांजर नसबंदी शस्त्रक्रिया आणि लसीकरण: 31 कोटी

डॉग पाउंड व व्हेटरनरी क्लिनिक बांधणी: 1 कोटी 20 लाख

भटकी कुत्री पकडण्यासाठी पॉंडची संख्या वाढवणे: 5 कोटी

युनिव्हर्सल ॲनिमल वेल्फेअर सोसायटीच्या माध्यमातून एप्रिल 2025 ते फेब्रुवारी 2026 या कालावधीत 1,40,081 कुत्र्यांचे लसीकरण करण्यात आले. तसेच रेबीज जनजागृतीसाठी WVS संस्थेने 209 शाळा, 63,372 विद्यार्थी व 2,060 शिक्षकांपर्यंत पोहोच केली आहे.

तीन नवीन शेल्टर होणार
सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार शाळा, रुग्णालये, बस थांबे, रेल्वे स्थानक परिसरातील भटके कुत्रे पकडून शेल्टरमध्ये ठेवण्यासाठी शिंदेवाडी जकात नाका, भूगाव जकात नाका व हडपसर येथील रामटेकडी इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये 3 जागा निश्चित केल्या आहेत. तिथे बांधकाम व दुरुस्तीचे काम सुरू झाले आहे.

नागरिकांच्या तक्रारीसाठी 9689931706 हा 24X7 हेल्पलाइन क्रमांक सुरू करण्यात आला आहे. Animal Birth Control Rules 2001 व 2023 नुसार कुत्रे पकडून नसबंदी, अँटी रेबीज लस देऊन 5 दिवसांनी त्याच ठिकाणी सोडले जातात.

दरम्यान, Canine Control & Care या संस्थेने मोहननगर बाणेर व नायडू हॉस्पिटल येथील केंद्र मनपाच्या ताब्यात दिले असून ती केंद्रे नव्याने 5 वर्षांसाठी चालवण्याचा प्रस्ताव प्रशासनाने ठेवला आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: