Prajit Nair IAS | पुणे महापालिकेच्या आकृतिबंधाच्या पदसंख्येत केला जाणार बदल!

Homeadministrative

Prajit Nair IAS | पुणे महापालिकेच्या आकृतिबंधाच्या पदसंख्येत केला जाणार बदल!

Ganesh Kumar Mule Aug 07, 2026 9:29 PM

Pune PMC JE Recruitment | राज्य सरकारच्या मार्गदर्शना अभावी दिड वर्षापासून थांबलीय कनिष्ठ अभियंता सरळसेवा भरती प्रक्रिया! | अर्ज केलेल्या २७८७९ उमेदवारांचे काय होणार?
PMC Recruitment | ‘पुणे मनपा भरतीसाठी दलालांना पैसे देऊ नका’ | महापालिकेचे नागरिकांना आवाहन 
PMC Recruitment Portal | महापालिकेच्या सर्व प्रकारच्या भरतीसाठी ऑनलाइन पोर्टल अंतिम टप्प्यात | बनावट भरती रॅकेटविरोधात कठोर कारवाईचे श्रीनाथ भिमाले यांचे निर्देश

Prajit Nair IAS | पुणे महापालिकेच्या आकृतिबंधाच्या पदसंख्येत केला जाणार बदल!

| 10 दिवसांत माहिती सादर करण्याचे आदेश

| 23 ग्रामपंचायतींच्या समावेशामुळे कर्मचारी पदसंख्येत बदल आवश्यक

 

PMC Recruitement Rules – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत 23 ग्रामपंचायतींचा समावेश झाल्यानंतर वाढलेल्या कामाच्या व्यापानुसार आता महापालिकेच्या आस्थापनेवरील पदांचा सुधारीत आकृतिबंध तयार करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यासाठी सर्व विभागांनी 10 दिवसांच्या आत विभागनिहाय माहिती सादर करण्याचे आदेश अतिरिक्त महापालिका आयुक्त प्रजित नायर यांनी काढले आहेत. (Pune Municipal Corporation – PMC)

महापालिका प्रशासनाने एक कार्यालयीन परिपत्रक जारी केले आहे. त्यानुसार पुणे महानगरपालिका सेवाप्रवेश सेवा व सेवांचे वर्गीकरण नियम 2014 आणि महाराष्ट्र शासन नगर विकास विभागाचा 26 ऑगस्ट 2014 चा शासन निर्णय यानुसार महापालिकेच्या आस्थापना मान्य आहे.

त्यानंतर तेविस ग्रामपंचायतींचे क्षेत्र पुणे महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट करण्यात आले. त्यामुळे शहराचा विस्तार आणि कामाचा व्याप वाढला आहे. यामुळे सध्या अस्तित्वात असलेल्या शासन मान्य आकृतिबंधामधील विविध विभागांतील शेड्युलमधील पदसंख्येमध्ये कमी-अधिक प्रमाणात बदल करणे आवश्यक बनले आहे.

सर्व विभागप्रमुख आणि खातेप्रमुखांना त्यांच्या विभागातील पदांची सविस्तर माहिती 10 दिवसांच्या मुदतीत सादर करण्यास सांगण्यात आले आहे. यासाठी महापालिकेने स्वतंत्र Google Sheet तयार केली आहे.

त्यात प्रत्येक विभागाने मंजूर पदसंख्या, भरलेली पदे, रिक्त पदे, पदसंख्येत वाढ करावयाची संख्या आणि पदसंख्या कमी करावयाची असल्यास त्याची संख्या नमूद करावी लागणार आहे. तसेच नव्याने पद निर्माण करायचे असल्यास त्या पदाचा वर्ग, शैक्षणिक अर्हता आणि वेतनश्रेणी याची माहिती शेरा रकान्यात द्यावी लागणार आहे.

फक्त ऑनलाइन माहिती पुरेशी नसून, विभागाची माहिती खातेप्रमुखांच्या स्वाक्षरीने सामान्य प्रशासन विभागाकडे टपालाद्वारे देखील सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. मुदतीत माहिती सादर न केल्यास ती माहिती ग्राह्य धरली जाणार नाही, असे परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.

2014 नंतर पुणे महापालिकेच्या हद्दीत मोठ्या प्रमाणावर विस्तार झाला. त्यामुळे पाणीपुरवठा, घनकचरा व्यवस्थापन, पथ, आरोग्य यासह सर्वच विभागांवर कामाचा ताण वाढला आहे. त्यामुळे मनुष्यबळाची गरज लक्षात घेऊन आता पदांचा नव्याने आढावा घेऊन सुधारीत आकृतिबंध शासनाकडे मंजुरीसाठी पाठवण्याची तयारी प्रशासनाची आहे.

या परिपत्रकामुळे महापालिकेत नव्या भरतीचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता असून, रिक्त पदे भरण्याच्या प्रक्रियेलाही गती मिळण्याची अपेक्षा आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: