Pune PMC Mosquito Control | पुण्यात डास नियंत्रणासाठी २६५ कंत्राटी कर्मचाऱ्यांची फौज; ६ कोटी ९७ लाखांच्या खर्चाला  मंजुरी!

डास नियंत्रणासाठी २६५ कंत्राटी कर्मचारी नेमण्याच्या ६.९७ कोटींच्या प्रस्तावाला स्थायी समितीची मंजुरी.

Homeadministrative

Pune PMC Mosquito Control | पुण्यात डास नियंत्रणासाठी २६५ कंत्राटी कर्मचाऱ्यांची फौज; ६ कोटी ९७ लाखांच्या खर्चाला  मंजुरी!

Ganesh Kumar Mule Nov 23, 2026 9:10 AM

CHS Portal | PMC Health Service | अंशदायी वैद्यकीय योजनेचे संगणकीकरण! | महापालिका कर्मचाऱ्यांना CHS कार्ड साठी पोर्टलवर माहिती भरण्याचे आदेश
MLA Hemant Rasane | पुणे शहरात वाढत असलेल्या ‘गुलियन बॅरी सिंड्रोम’ (GBS) च्या प्रतिबंधासाठी तातडीच्या उपाययोजनांची मागणी
Pavneet Kaur IAS | किटक प्रतिबंधक विभागातील १०० कर्मचाऱ्यांना घाणभत्ता, धुलाई भत्ता व वारस हक्क लागू करण्याचे अतिरिक्त आयुक्त यांचे आदेश | अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर यांचे परिपत्रक जारी

Pune PMC Mosquito Control | पुण्यात डास नियंत्रणासाठी २६५ कंत्राटी कर्मचाऱ्यांची फौज; ६ कोटी ९७ लाखांच्या खर्चाला  मंजुरी!

नाशिकच्या दिग्विजय एन्टरप्रायजेसला काम; इनडोअर व्हेक्टर कंट्रोल प्रोग्रामसाठी कंत्राटी कर्मचारी पुरविणार

 

PMC Health Department  – The Karbhari News Service  – शहरातील डासांचा प्रादुर्भाव आणि साथीच्या आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पुणे महापालिका २६५ कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणार आहे. या कामासाठी ६ कोटी ९७ लाख ५९ हजार २०९ रुपये ५० पैसे खर्च करण्याच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मान्यता दिली आहे. विशेष म्हणजे, या कामासाठी नाशिक येथील दिग्विजय एन्टरप्रायजेस या ठेकेदाराची निवड करण्यात आली आहे. (PMC Standing Committee)

महापालिकेच्या आरोग्य विभागातील किटक प्रतिबंधक विभागामार्फत शहरात इनडोअर व्हेक्टर कंट्रोल प्रोग्राम राबविण्यात येणार आहे. याअंतर्गत डास नियंत्रण आणि साथीच्या आजारांना प्रतिबंध करण्यासाठी आवश्यक कामे केली जाणार आहेत.

निविदा प्रक्रियेत चार ठेकेदारांचा सहभाग

या कामासाठी सुरुवातीला GeM पोर्टलवर निविदा प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे ती रद्द करण्यात आली. त्यानंतर महाटेंडर पोर्टलवर दोन वर्षांच्या कालावधीसाठी निविदा मागविण्यात आली. पहिल्या निविदा प्रक्रियेत सहा निविदा प्राप्त झाल्या; मात्र एकच निविदाधारक पात्र ठरल्याने प्रशासनाने पुन्हा अल्पमुदतीची निविदा प्रसिद्ध केली.

दुसऱ्या प्रक्रियेत चार निविदा प्राप्त झाल्या. त्यापैकी श्री. एन्टरप्रायजेस, यु. आर. फॅसिलिटी सर्व्हिसेस आणि जय शंकर असोसिएट्स हे तीन निविदाधारक तांत्रिकदृष्ट्या अपात्र ठरले. त्यामुळे नाशिकच्या दिग्विजय एन्टरप्रायजेस या एकमेव पात्र ठरलेल्या ठेकेदाराची निवड करण्यात आली.

प्रतिदिन प्रति कर्मचारी १,११२ रुपये दर

या ठेकेदाराने सुरुवातीला प्रतिदिन प्रति कर्मचारी पर्यवेक्षकीय शुल्कासह १,११४.१३ रुपये दर दिला होता. दर कमी करण्यास सांगितल्यानंतर ०.१४ टक्के कपात करून १,११२.५७ रुपये दराने काम करण्याची तयारी दर्शवली. हा दर महापालिकेच्या अंदाजित दरापेक्षा १.३६८ टक्क्यांनी जास्त असला तरी बाजारभावाशी सुसंगत असल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे.

२ सप्टेंबरपासून काम सुरू; खर्चाला मान्यता

विशेष म्हणजे, स्थायी समिती अध्यक्षांच्या आदेशानुसार २ सप्टेंबर २०२६ पासून हे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे सुरू असलेल्या कामाची बिले अदा करण्यासाठी आणि पुढील खर्चाला मान्यता मिळवण्यासाठी प्रशासनाने स्थायी समितीकडे प्रस्ताव पाठवला होता. या प्रस्तावाला आता स्थायी समितीने मंजुरी दिली आहे.

सन २०२६-२७ या आर्थिक वर्षात या कामासाठी उपलब्ध असलेल्या ७ कोटी रुपयांच्या तरतुदीतून ६ कोटी ९७ लाख ५९ हजार २०९ रुपये ५० पैसे खर्च करण्यास मान्यता देण्यात आली आहे. तसेच २०२७-२८ या आर्थिक वर्षातही आवश्यकतेनुसार २६५ किंवा कमी-जास्त संख्येने कंत्राटी कर्मचारी उपलब्ध करून घेण्यास मान्यता मागण्यात आली होती.

किमान वेतनवाढीचा फरकही महापालिका देणार

किमान वेतन दरात वेळोवेळी वाढ झाल्यास त्यानुसार कर्मचाऱ्यांना वाढीव वेतन देण्याची जबाबदारी ठेकेदाराची असेल. मात्र, या वाढीव वेतनाचा फरक महापालिकेकडून अदा करण्यासही मान्यता देण्यात आली आहे.

या निर्णयामुळे शहरात डास नियंत्रणासाठी इनडोअर व्हेक्टर कंट्रोल प्रोग्राम प्रभावीपणे राबविण्यास मदत होणार असल्याचा प्रशासनाचा दावा आहे. आता या मोहिमेच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीतून डासांचा प्रादुर्भाव आणि साथीच्या आजारांवर कितपत नियंत्रण मिळते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: