PMC Property tax Department | मिळकत कर विभागाकडून ५८ मिळकती सील | जप्ती कारवाई अधिक तीव्र करण्यात येणार

Homeadministrative

PMC Property tax Department | मिळकत कर विभागाकडून ५८ मिळकती सील | जप्ती कारवाई अधिक तीव्र करण्यात येणार

Ganesh Kumar Mule Feb 03, 2026 9:05 PM

Pune PMC News | शीतल वाकडे यांच्या नियुक्तीला पुणे महापालिकेत विरोध | महापालिकेतील कर्मचाऱ्यांवर अन्याय होत असल्याची भावना 
Pune Rain Red Alert | पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज | नागरिकांसाठी महत्त्वाचे आपत्ती व्यवस्थापन हेल्पलाईन क्रमांक जाहीर
Union Budget 2025 | अपेक्षेप्रमाणे निराशाजनक अंदाजपत्रक देशाच्या आर्थिक भविष्याबाबत चिंता वाढू लागली – मोहन जोशी

PMC Property tax Department | मिळकत कर विभागाकडून ५८ मिळकती सील | जप्ती कारवाई अधिक तीव्र करण्यात येणार

| आजपर्यंत २६०४ कोटी महसूल जमा

 

Pune Property tax – (The Karbhari News Service)  – पुणे महानगरपालिका कार्यक्षेत्रातील थकीत मिळकतदारांच्या एकूण ५८ मिळकतींवर जप्ती कारवाई करण्यात आली आहे. अशी माहिती उपायुक्त रवी पवार यांनी दिली. (Ravi Pawar PMC)

पुणे महानगरपालिकेने थकीत कर वसुलीसाठी आता मोठ्या प्रमाणावर विशेष मोहीम हाती घेतली आहे. न्यायालयीन प्रकरणे (कोर्ट केसेस), दुबार मूल्यांकन प्रकरणे तसेच मोबाईल टॉवर वादातील प्रकरणे वगळता, सुमारे ५,५०० कोटी रुपयांची थकबाकी अद्याप वसूल होणे अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेच्या प्रशासनाने वसुलीला गती देण्यासाठी ‘जप्ती मोहीम सुरू केली असून, आज रोजी सुमारे ५८ मिळकतींना जप्ती नोटीस बजावून त्या सील करण्यात आल्या आहेत.

महानगरपालिकेने आता विशेषतः मोठ्या थकबाकीदारांवर लक्ष केंद्रित करून जप्ती कारवाई सुरू केली आहे. निर्धारित वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरू असून, येत्या काळात ही मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार आहे. असेही पवार यांनी सांगितले.

आज अखेर मिळकतकरापोटी २६०४ कोटी मनपा तिजोरीत जमा झाले असून गत वर्षी २००७ कोटी भरणा झाला होता. या वर्षी गत वर्षीच्या तुलनेत सुमारे ६०० कोटी अधिकचा भरणा जमा झाला आहे. थकबाकीदारांनी स्वयंस्फूर्तीने थकीत कर भरून महानगरपालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: