Pune PMC Encroachment Action | कोरेगाव पार्क ते कोंढवा, धायरी ते कसबा पेठ; पुणे महापालिकेची अतिक्रमणांवर मोठी मोहीम

पुण्यात १.७२ लाख चौ. फुटांवरील अतिक्रमण हटवले

Homeadministrative

Pune PMC Encroachment Action | कोरेगाव पार्क ते कोंढवा, धायरी ते कसबा पेठ; पुणे महापालिकेची अतिक्रमणांवर मोठी मोहीम

Ganesh Kumar Mule Nov 23, 2026 9:14 PM

Pune News | पुणे शहरातील अतिक्रमण, उत्खनन प्रकरणी गुन्हे दाखल करण्याचे आदेश | महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांना घेतले फैलावर
Arvind Shinde | PMC Pune | महापालिकेच्या बांधकाम विभागावर अरविंद शिंदे यांचे आहे लक्ष! | महापालिका आयुक्त यांच्याकडे केल्या या मागण्या | वाचा सविस्तर 
Pune PMC Encroachment Drive | पुण्यात महापालिकेचा बुलडोझर धडाडला! ९९ हजार चौ. फुटांवरील अतिक्रमणे हटवली | तुमच्या भागात कुठे झाली कारवाई?

Pune PMC Encroachment Action | कोरेगाव पार्क ते कोंढवा, धायरी ते कसबा पेठ; पुणे महापालिकेची अतिक्रमणांवर मोठी मोहीम

 

Pune PMC News – The Karbhari News Service – पुणे शहरातील अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणांविरोधात पुणे महानगरपालिकेने सोमवारी (दि. २३ नोव्हेंबर) मोठी कारवाई केली. शहरातील पाच परिमंडळांमध्ये राबविण्यात आलेल्या या मोहिमेत तब्बल १ लाख ७२ हजार ३०० चौरस फूट क्षेत्रावरील अनधिकृत कच्चे आणि पक्के बांधकामे निष्कासित करण्यात आली. तसेच अनधिकृतपणे व्यवसाय करणाऱ्यांचे २० स्टॉल, १७ हातगाड्या, ६८ पथाऱ्या आणि १७ गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले. याशिवाय २९५ इतर साहित्यांवरही कारवाई करण्यात आली. (Pune Municipal Corporation – PMC)

महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागामार्फत ही मोहीम राबविण्यात आली. उप आयुक्त सोमनाथ बनकर आणि परिमंडळ क्रमांक २ चे उप आयुक्त अविनाश सकपाळ यांच्या नियंत्रणाखाली ही कारवाई करण्यात आली. सहाय्यक उप आयुक्त कैलास वाळेकर आणि एमएसएफचे मुख्य अधिकारी शहाजी पवार यावेळी उपस्थित होते.

पाच परिमंडळांत एकाच वेळी कारवाई

महापालिकेने शहरातील विविध भागांमध्ये अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवली. यामध्ये मध्यवर्ती पुण्यासह उपनगरांतील प्रमुख रस्ते, चौक आणि व्यावसायिक परिसरांना लक्ष्य करण्यात आले.

१) ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालय :

ढोले पाटील रस्ता, रुबी हॉल परिसर, जहांगीर हॉस्पिटल चौक, रमाबाई आंबेडकर रस्ता, महात्मा फुले शाळा, ताडीवाला रोड, धर्मादाय आयुक्त कार्यालय परिसर, कोरेगाव पार्क लेन क्रमांक ६ आणि नॉर्थ मेन रोड परिसरात कारवाई करण्यात आली. या भागात ४४ हजार ७०० चौरस फुटांवरील अनधिकृत बांधकामे हटविण्यात आली. तसेच १ स्टॉल, ५ हातगाड्या, ८ पथाऱ्या आणि ६ सिलेंडरवर कारवाई करण्यात आली. ६३ शेडसह इतर ९ साहित्यांवरही कारवाई करण्यात आली.

२) शिवाजीनगर-घोले रोड क्षेत्रीय कार्यालय :

काँग्रेस भवनसमोर, खंडोजी बाबा चौक आणि सेनापती बापट रस्त्यावर कारवाई करण्यात आली. या परिसरात ६ हजार ५०० चौरस फुटांवरील अनधिकृत बांधकामे हटविण्यात आली. तसेच ५ पथाऱ्या निष्कासित करण्यात आल्या.

३) सिंहगड रोड-वारजे-कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालय :

वडगाव, धायरी फाटा ते धायरी, प्रभात रोड, आंबेडकर चौक, कॅनॉल रस्ता, वारजे स्मशान रोड आणि वारजे तपोधाम सोसायटी परिसरात कारवाई करण्यात आली. या भागात ३२ हजार ६०० चौरस फुटांवरील बांधकामे हटविण्यात आली. १८ स्टॉल, २ हातगाड्या, १० पथाऱ्या आणि ४ सिलेंडरवर कारवाई करण्यात आली. तसेच १० इतर साहित्य जप्त करण्यात आले.

४) कोंढवा-उंड्री-मांजरी क्षेत्रीय कार्यालय :

चिंतामणी नगर, जेएसपीएम चौक, सातव नगर, हांडेवाडी रोड, श्रीराम चौक आणि हांडेवाडी चौक परिसरात मोठी कारवाई करण्यात आली. या भागात सर्वाधिक ६७ हजार ५०० चौरस फुटांवरील अनधिकृत बांधकामे हटविण्यात आली. ५ हातगाड्या आणि २४ पथाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. याशिवाय १३४ शेड आणि ५४ झोपड्यांवर कारवाई करण्यात आली.

५) कसबा पेठ-विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालय :

अपोलो टॉकीज, १५ ऑगस्ट चौक, संत कबीर चौक, अल्पना टॉकीज, हिराबाग कोठी आणि टिळक रोड परिसरात कारवाई करण्यात आली. या भागात २१ हजार चौरस फुटांवरील अनधिकृत बांधकामे हटविण्यात आली. १ स्टॉल, ५ हातगाड्या, १९ पथाऱ्या आणि ७ सिलेंडरवर कारवाई करण्यात आली. तसेच २ रसगुऱ्हाळांसह इतर २५ साहित्यांवर कारवाई करण्यात आली.

कारवाईसाठी १० जेसीबी, २०१ कर्मचारी तैनात

या व्यापक मोहिमेसाठी महापालिकेचा १ अधिकारी, २० पोलीस कर्मचारी, एमएसएफचे ४० जवान आणि २०१ विगारी सेवक तैनात करण्यात आले होते. कारवाईसाठी १० जेसीबी, १० गॅस कटर आणि १ ट्रॅक्टरचा वापर करण्यात आला.

महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील अनधिकृत अतिक्रमणांवर यापुढेही वारंवार आणि नियमितपणे कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे शहरातील रस्ते, पदपथ आणि सार्वजनिक जागांवरील अतिक्रमणांविरोधातील मोहीम आगामी काळातही सुरू राहणार आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: