Pune Water Use | पाणी वापर कमी करण्याबाबत पुणे महापालिका हतबल! | MWRRA च्या सुनावणी कडे लक्ष!

Homeadministrative

Pune Water Use | पाणी वापर कमी करण्याबाबत पुणे महापालिका हतबल! | MWRRA च्या सुनावणी कडे लक्ष!

Ganesh Kumar Mule Feb 03, 2026 8:31 PM

Pandharpur Aashadhi wari palkhi sohala | सोलापूर, पुणे व सातारा जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना निर्मल वारीसाठी ४ कोटी २१ लाख रुपये
PMC Employees | Strike | सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मनपा कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून काम सुरु! | क्षेत्रीय कार्यालय स्तरावरून चांगला प्रतिसाद
PMC GB on Garbage | कचरा माफिया ठेकेदारांनी शहरात कचरा साठवला | विरोधी पक्षांचा मुख्य सभेत जोरदार आरोप

Pune Water Use | पाणी वापर कमी करण्याबाबत पुणे महापालिका हतबल! | MWRRA च्या सुनावणी कडे लक्ष!

 

Pune Water Supply – (The Karbhari News Service) – शहरातील पाणी वापर कमी करण्याचे आदेश महाराष्ट्र जलसंपत्ती नियामक प्राधिकरण ने पुणे महापालिका प्रशासनाला दिले आहेत. मात्र प्रशासन पाणी वापर कमी करण्याबाबत हतबल असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान पाणी वापर कमी केला नसला तरी त्याबाबत काय उपाययोजना सुरु आहेत, याबाबत महापालिकेने प्राधिकरणाला नुकतेच प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. यावर प्राधिकरण कडे सुनावणी होणार आहे. यात प्राधिकरण काय आदेश देणार, याकडे लक्ष लागून राहिले आहे. (MWRRA – Pune Irrigation)

 

पुणे महापालिका मापदंडानुसार पाणी वापरत नाही. अशी तक्रार महाराष्ट्र जलसंपत्ती नियामक प्राधिकरण यांच्याकडे करण्यात आली आहे. त्यावर सध्या सुनावणी आहे. पुणे महापालिकेचा पाणी वापर जास्त आहे, अशी तक्रार  पाटबंधारे विभागाकडून करण्यात येते. शिवाय सांडपाण्यावर देखील महापालिका प्रक्रिया करत नाही, अशी देखील तक्रार सातत्याने करण्यात येते. यावर प्राधिकरणाने महापालिकेला आदेश दिले आहेत कि शहरातील पाणी वापर कमी करा. तसेच यावर काय उपयोजना सुरु आहेत, याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करा.

दरम्यान महापालिकेने अजून पाणी वापर कमी केलेला नाही. कारण पाणी वापर कमी केला तर शहरात पाणीटंचाई निर्माण होते. त्यामुळे लोकप्रतिनिधी आणि नागरिकांचा त्रास प्रशासनाला सहन करावा लागतो. त्यामुळे महापालिका प्रशासन हतबल आहे.

दरम्यान प्राधिकरणाच्या आदेशानुसार महापालिकेने नुकतेच प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. त्यात महापालिकेने म्हटले आहे कि शहराची हद्द वाढली आहे. लोकसंख्या वाढली आहे. त्यामुळे साहजिकच पाण्याची गरज वाढते आहे. महापालिकेने म्हटले आहे कि, जायका प्रकल्प, अमृत मधील सांडपाणी प्रकल्पाची कामे सुरु आहेत. ते पूर्ण झाल्यानंतर सांडपाण्यावर पूर्णपणे प्रक्रिया केली जाईल.  शहराच्या भौगोलिक रचनेमुळे शहरात असमान पाणीपुरवठा होत आहे. वाढीव पाणी वापर असून देखील सर्वांना पाणी मिळत नाही. मात्र समान पाणीपुरवठा योजनेमुळे हा प्रश्न निकाली निघेल. ही योजना देखील लवकर  पूर्ण होईल. यावर आता प्राधिकरणाकडे सुनावणी होणार आहे. यात प्राधिकरण काय आदेश देते, याकडे लक्ष लागून राहिले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: