Pune Speed Breakers | महापालिका पथ विभागाने शास्त्रीय मानकांप्रमाणे असलेले स्पीड ब्रेकर दाखवावे  | प्रति स्पीड ब्रेकर १०० रुपये बक्षीस देऊ 

HomeBreaking Newsपुणे

Pune Speed Breakers | महापालिका पथ विभागाने शास्त्रीय मानकांप्रमाणे असलेले स्पीड ब्रेकर दाखवावे  | प्रति स्पीड ब्रेकर १०० रुपये बक्षीस देऊ 

गणेश मुळे Feb 19, 2024 1:19 PM

Transfer | PMC Pune employees | बदली झाली तरी मूळ खाते सोडू वाटेना! | अशा कर्मचाऱ्यांचे वेतन अदा न करण्याचे आदेश
Ganesh Utsav Meeting | PMC Pune | पुणे महापालिकेची गणेश मंडळासोबत संयुक्त बैठक 28 ऑगस्ट ऐवजी 8 सप्टेंबरला
PMC commissioner | Budget | समान पाणीपुरवठा आणि आवास योजना पूर्ण करण्याचे लक्ष्य | आयुक्तांनी बजेट मध्ये केली भरीव तरतूद

Pune Speed Breakers | महापालिका पथ विभागाने शास्त्रीय मानकांप्रमाणे असलेले स्पीड ब्रेकर दाखवावे  | प्रति स्पीड ब्रेकर १०० रुपये बक्षीस देऊ

| सजग नागरिक मंचाचे महापालिका पथ विभागाला आव्हान

Pune Speed Breakers | पुणे | पुणे महापालिकेच्या पथ विभागास (PMC Road Department) सजग नागरिक मंचाने (Sajag Nagrik Manch Pune) जाहीर आव्हान दिले आहे. पुणे शहरात मानकांप्रमाणे असलेले स्पीड ब्रेकर विभागाने दाखवावेत, आम्ही अशा प्रत्येक स्पीड ब्रेकर मागे शंभर रुपये बक्षीस देऊ. असे खुले आव्हान देण्यात आले आहे. पुणे शहरात एकही स्पीड ब्रेकर शास्त्रीय मानकांप्रमाणे नाही, असा दावा देखील मंचाच्या विवेक वेलणकर (Vivek Velankar Pune) यांनी केली आहे. (Pune Municipal Corporation (PMC)
वेलणकर यांच्या निवेदनानुसार पथ विभागाच्या अभियंत्यांनी पायी चालत रस्त्यांचा सर्व्हे (PMC Road Department Walking Survey) केल्याचं आम्ही वाचले. यातून शास्त्रीय मानकांप्रमाणे नसलेले स्पीड ब्रेकर महापालिका दुरुस्त करणार असल्याचेही वाचले. खरं तर  उच्च न्यायालयाने २००५ साली दिलेल्या आदेशाचे अनुपालन करुन सर्व अशास्त्रीय स्पीड ब्रेकर उखडून टाकणे आवश्यक आहे. आमच्या मते आज संपूर्ण पुणे शहरात एकही स्पीड ब्रेकर शास्त्रीय मानकांप्रमाणे नाही. त्यामुळे आमचे पथ विभागास जाहीर आव्हान आहे की आपण पुणे शहरात मानकांप्रमाणे असलेले स्पीड ब्रेकर दाखवावेत, आम्ही अशा प्रत्येक स्पीड ब्रेकर मागे शंभर रुपये बक्षीस देऊ करत आहोत. (Pune PMC News)
वेलणकर यांनी पुढे म्हटले आहे कि, खरं तर अभियंत्यांनी केलेला सर्व्हे तातडीने महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केला पाहिजे. जेणेकरुन नागरिकही त्याची सत्यासत्यता पडताळून पाहू शकतील. तसेच उच्च न्यायालयाच्या आदेशाचा मान ठेवण्यासाठी पुण्यातील सर्व अशास्त्रीय स्पीड ब्रेकर तातडीने उखडून टाकण्यासाठी पावले उचलावीत. शिवाय यापुढे शहरात एकही स्पीड ब्रेकर अशास्त्रीय पद्धतीने बांधला जाणार नाही याची काळजी घ्यावी. नियमाप्रमाणे प्रत्येक स्पीड ब्रेकर बांधताना वाहतूक पोलीसांची परवानगी घेणे आवश्यक आहे याचीही दक्षता घ्यावी. अशीही मागणी वेलणकर यांनी केली आहे.