PMC Primary Education Department | महापालिका शाळा मधील विदयार्थी वाहतूक बसेसमध्ये महिला सुरक्षा मदतनीस यांची होणार नेमणूक!
| आगामी बजेटमध्ये होणार तरतूद
Pune PMC News – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिका प्राथमिक विभागाकडील विद्यानिकेतन व क्रिडानिकेतन शाळेतील (PMC Schools) विद्यार्थी वाहतुक सुरक्षिततेच्या दृष्टीने नविन शासन धोरणानुसार विद्यार्थी वाहतुक बसेस मध्ये मुली (विद्यार्थीनी) असल्याने महिला सुरक्षा मदतनीस नेमणे अनिवार्य करण्यात आलेले आहे. त्यानुसार मदतनीस यांची लवकरच नेमणूक केली जाणार आहे. त्यासाठी आगामी बजेटमध्ये तरतूद करण्यात आली आहे. अशी माहिती उपायुक्त आशा राऊत (Asha Raut PMC) यांनी दिली. (Pune Municipal Corporation – PMC)
– शिक्षण विभागाने सुरक्षा विभागाकडे केली होती मागणी
शिक्षण विभाग (प्राथमिक) यांच्या विदयानिकेतन व क्रीडानिकेत शाळेतील विदयार्थी वाहतूकीसाठी पुणे परिवहन महामंडळ (PMPML) यांचे कडून बसेस पुरविण्यात येतात. मनपा शाळेतील विदयार्थी वाहतूक सुरक्षिततेच्या दृष्टीने नवीन शासन धोरणानुसार विदयार्थी वाहतूक बसेस मध्ये मुली (विदयार्थीनी) असतील तर महिला सुरक्षा मदतनीस नेमणे अनिवार्य करण्यात आलेले आहे. शासन निर्णयानुसार परिवहन महामंडळाने बसेस मध्ये सुरक्षा मतदनीस पुरविणे बाबत शिक्षण विभागानकडे मागणी केलेली होती.
त्यानुसार पुणे परिवहन महामंडळाकडून एकूण ४८ बसेसव्दारे मनपा शाळेतील विदयार्थ्यांची (मुले व मुली ) वाहतूक करण्यात येते. ही बाब विचारात घेवून विदयार्थी वाहतूक बसेसमध्ये महिला सुरक्षा मदतनीस यांची नेमणूक करणे बाबत आपल्या विभागाकडून पुढील कार्यवाही तात्काळ करण्यात यावी. अशी मागणी शिक्षण विभागाने सुरक्षा विभागाकडे केली होती.
– सुरक्षा विभागाने निधीची सांगितली अडचण
याबाबत सुरक्षा विभागाने शिक्षण विभागाला पत्र लिहिले. त्यात त्यांनी म्हटले कि, ४८ महिला सुरक्षा रक्षक पुरविणेकामी १ वर्षाकरीता अंदाजे रक्कम २ कोटी इतका खर्च येणार आहे. सुरक्षा विभागाकडे सध्या पुरेशी तरतुद उपलब्ध नसल्याने मनुष्यबळ उपलब्ध करून देणे अडचणीचे ठरत आहे. आपले विभागाकडुन पुरेशी तरतुद उपलब्ध करून मिळल्यास त्यानुसार पुढील कार्यवाही त्वरीत आमचे विभागामार्फत सत्वर करण्यात येईल. त्यामुळे हा विषय तसाच पडून होता.
दरम्यान यावर शिक्षण विभाग च्या उपायुक्त आशा राऊत यांनी महापालिका आयुक्तांना मागणी केली की आगामी बजेटमध्ये या कामासाठी निधी उपलब्ध करून द्यावा. त्यानुसार आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यानुसार लवकरच मदतनीस यांच्या नेमणुका केल्या जातील. असे राऊत यांनी सांगितले.
—-
विद्यार्थी वाहतुक बसेस मध्ये मुली (विद्यार्थीनी) साठी महिला सुरक्षा मदतनीस नेमणे आवश्यक आहे. मात्र त्यासाठी निधीची कमतरता होती. मात्र आगामी बजेटमध्ये हा निधी उपलब्ध होणार आहे. त्यानुसार नेमणुका केल्या जातील.
– आशा राऊत, उपायुक्त.
COMMENTS