DCM Eknath Shinde | विविध विकासकामांच्या भूमिपूजनासाठी उपमुख्यमंत्री पुण्यात येणार – शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे  | उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस अनोख्या सामाजिक उपक्रमांनी साजरा होणार

HomeBreaking News

DCM Eknath Shinde | विविध विकासकामांच्या भूमिपूजनासाठी उपमुख्यमंत्री पुण्यात येणार – शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे | उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस अनोख्या सामाजिक उपक्रमांनी साजरा होणार

Ganesh Kumar Mule Jan 22, 2025 2:21 PM

Lord Shri Rama Statue | हडपसरमध्ये साकारणार 9 फूट उंचीचा प्रभू श्रीरामाचा पूर्णाकृती पुतळा 
Hadapsar | Animal Hospital | हडपसर मधील नियोजित प्राणी हॉस्पिटलच्या विरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन | हॉस्पिटल हलवण्याची मागणी
Pune | Animal Hospital | हडपसर ला होणार प्राण्यांचे हॉस्पिटल!  | भटक्या कुत्र्यांचाही केला जाणार बंदोबस्त 

DCM Eknath Shinde | विविध विकासकामांच्या भूमिपूजनासाठी उपमुख्यमंत्री पुण्यात येणार – शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे

| उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस अनोख्या सामाजिक उपक्रमांनी साजरा होणार

 

Pramod Nana Bhangire – (The Karbhari News Service) – राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (DCM Eknath Shinde Birthday) यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे शहर शिवसेना आणि शहरप्रमुख प्रमोद भानगिरे (Pramod Nana Bhangire) यांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी तसेच हडपसर मधील विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते पार पडणार असल्याची माहिती शहरप्रमुख प्रमोद भानगिरे यांनी दिली आहे. (Pune Shivsena)

दिनांक ९ फेब्रुवारी रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस राज्यभर सर्वत्र ठिकाणी साजरा होणार आहे. याच पार्श्वभूमीवर पुणे शहर शिवसेना आणि शहरप्रमुख प्रमोद भानगिरे यांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आणि भूमिपूजन तसेच लोकार्पण सोहळ्याचे आयोजन केले आहे. हडपसर मधील विविध विकासकामांचा भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लवकरच पार पडणार असल्याची माहिती भानगिरे यांनी दिली आहे.

वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात पुण्यातील लाडक्या बहिणींसाठी भव्य होम मिनिस्टर कार्यक्रम, दिव्यांग बांधवांना कृत्रिम अवयव वाटप, महिलांना रोजगाराभिमुख साहित्य वाटप करणार आहे. होम मिनिस्टर कार्यक्रमात विजेत्यांना एमजी इलेक्ट्रिक कारसह लाखोंची बक्षिसे देखील वितरित करण्यात येणार आहे. तसेच यामध्ये उपस्थित असणाऱ्या प्रत्येक महिला भगिनींना आकर्षक भेटवस्तू दिले जाणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लाभावी यासाठी शहरप्रमुख प्रमोद भानगिरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली असून सकारात्मक प्रतिसाद देत कार्यक्रमास उपस्थित राहणार असल्याचा विश्वास दिला असल्याचे त्यांनी सांगितले.

त्याचबरोबर हडपसर मतदारसंघातील तरवडे वस्ती येथे संतसृष्टी मध्ये नुकत्याच उभारण्यात आलेल्या २१ फुटांच्या भव्य विठ्ठलाच्या मूर्तीचे आणि संतसृष्टीचे लोकार्पण, महात्मा फुले जलतरण तलाव तसेच हडपसर ते महादेववाडी अंतर्गत डीपी रस्ते आणि विविध विकासकामांचे भूमिपूजन केले जाणार आहे. येणाऱ्या काळात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाने हडपसर मतदारसंघासह पुणे शहरात विविध विकासात्मक बदल घडवून आणण्याचा विश्वास दिल्याचे भानगिरे यांनी सांगितले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0