PMC Officers Transfer | प्रतिभा पाटील, आशा राऊत यांची बदली | तर पुणे महापालिकेत सरकारकडून तीन नवीन अधिकारी
Pune PMC News – (The Karbhari News Service) – पुणे महापालिकेत उपायुक्त पदावर काम करणाऱ्या आणि महापालिकेत प्रति नियुक्तीवर आलेल्या प्रतिभा पाटील आणि आशा राऊत यांची बदली करण्यात आली आहे. पाटील यांची सहायक आयुक्त, नगर परिषद प्रशासन संचालनालय, मुंबई येथे तर राऊत यांची सहायक आयुक्त, नगर परिषद प्रशासन संचालनालय, मुंबई येथे बदली करण्यात आली आहे. राज्य सरकारकडून प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यातील या बदल्या आहेत. तर महापालिकेत सरकार कडून तीन नवीन अधिकारी प्रति नियुक्तीवर नियुक्त करण्यात आले आहेत. (Pune Municipal Corporation – PMC)
महाराष्ट्र शहरी प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पदस्थापना सरकार कडून करण्यात आली आहे. त्यानुसार महापालिकेतील काही अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. तर काही अधिकारी प्रति नियुक्तीवर घेण्यात आले आहेत.
पिंपरी चिंचवड महापालिकेत सहायक आयुक्त पदावर काम करणाऱ्या विजयकुमार थोरात यांना पुणे महापालिकेत उपायुक्त पदी नियुक्त करण्यात आले आहे. पीएमपीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रज्ञा पोतदार यांना पालिकेत सहायक आयुक्त पदावर नियुक्त करण्यात आले आहे. तसेच पिंपरी चिंचवड महापालिकेत प्रशासन अधिकारी म्हणून काम पाहणाऱ्या शीतल वाकडे याना पुणे महापालिकेत प्रशासन अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
सरकारच्या उपसचिव प्रियांका कुलकर्णी-छापवाले यांनी हे आदेश जारी केले आहेत.
—-
COMMENTS