PMPML Ticket Price Hike | पीएमपीच्या सुधारित तिकीट दराची अंमलबजावणी १ जून पासून | पीएमपी प्रशासनाचा निर्णय 

Homeadministrative

PMPML Ticket Price Hike | पीएमपीच्या सुधारित तिकीट दराची अंमलबजावणी १ जून पासून | पीएमपी प्रशासनाचा निर्णय 

Ganesh Kumar Mule May 30, 2025 7:49 PM

PMC Contract Employees Portal | कंत्राटी कामगारांसाठी स्वतंत्र पोर्टल तात्काळ सुरू करा | सुनिल शिंदे यांची महापालिका प्रशासनाकडे मागणी
Mahatma Gandhi Jayati | महात्मा गांधीचे विचार कधीच संपू शकत नाही | अरविंद शिंदे
Whatsapp New feature | एकाच वेळी चार फोनमध्ये एकच खाते वापरता येते

PMPML Ticket Price Hike | पीएमपीच्या सुधारित तिकीट दराची अंमलबजावणी १ जून पासून | पीएमपी प्रशासनाचा निर्णय

 

PMPML Pune – (The Karbhari News Service)  – पुणे महानगर परिवहन महामंडळार्माफत पुणे व पिंपरी चिंचवड शहर आणि पीएमआरडीए कार्यक्षेत्रात प्रवाशांकरीता बससेवा पुरविण्यात येते. परिवहन महामंडळाच्या बस संचलनामध्ये व प्रशासकीय कामकाजाच्या सोयीच्या दृष्टीने सुसूत्रता येणेकामी महाराष्ट्र शासनाच्या दिनांक ३१/०३/२०१८ रोजीच्या राजपत्रानुसार व राज्यातील महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, बेस्ट परिवहन उपक्रम व नागपूर शहर बससेवा यांनी केलेल्या तिकिट दरवाढीच्या धर्तीवर परिवहन महामंडळाने कि.मी. आधारित स्टेज रचनेत सहरचना करून ५ व १० कि.मी. अंतराने बस संचलनाचे १ ते ८० कि.मी. करीता ११ स्टेज करण्यास व त्या अनुषंगाने तिकिट व विविध पासेसचे सुधारित दर लागू करणेस  संचालक मंडळ व  प्रादेशिक परिवहन प्राधिकरण, पुणे यांनी मान्यता दिलेली आहे. त्या अनुषंगाने सुधारित स्टेज रचनेनुसार तिकिट व विविध पासेसच्या सुधारित दराची अंमलबजावणी दिनांक ०१/०६/२०२५ रोजीच्या पहाटे पासून करण्यात येणार आहे. (Pune PMP News)

– ज्या पासधारकांकडे मासिक पास रूपये ९००/- (एका मनपा हद्दीकरीता) असलेल्या पासेसची वैधता ही परिवहन महामंडळाने सुधारित पास दराने लागू केलेल्या दिनांक ०१/०६/२०२५ पासून पुढील दिनांकापर्यंत असल्यास त्या दिनांकापर्यंतच जुन्या पासधारकांना (एकाच मनपा हद्दीत) प्रवास करता येईल.

– ज्या पासधारकांकडे मासिक पास रूपये १२००/- (दोन्ही मनपा हद्दीकरीता) असलेल्या पासेसची वैधता ही परिवहन महामंडळाने सुधारित पास दराने लागू केलेल्या दिनांक ०१/०६/२०२५ पासून पुढील दिनांकापर्यंत असल्यास त्या दिनांकापर्यंतच जुन्या पासधारकांना (दोन्ही मनपा हद्दीत) प्रवास करता येईल.

– विद्यार्थ्यांसाठी असणारा मासिक, तिमाही, सहामाही व वार्षिक पास तसेच विद्यार्थी पंचिंग पास अंतरानुसार दर आकारणी (५० टक्के सवलत) जुन्या दराने आकारणी करणेत येणार आहे.

– ज्येष्ठ नागरिक दैनंदिन व मासिक पास तसेच पीएमआरडीए च्या मासिक पास दरात कोणताही बदल करणेत आलेला नाही.

बदलाची नोंद घेवून प्रवाशी नागरिकांनी कंडक्टर सेवकांना सहकार्य करावे, असे आवाहन परिवहन महामंडळाकडून करणेत येत आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: