PMC Officers | वारंवार बदली होऊनही काही अधिकाऱ्यांना पुणे महापालिकेचा ‘मोह’ सुटेना | ‘आर्थिक’ राजधानीत सगळी ‘प्रतिभा’ पणाला लावून महत्वाची खाती मिळण्याची “आशा”!

Homeadministrative

PMC Officers | वारंवार बदली होऊनही काही अधिकाऱ्यांना पुणे महापालिकेचा ‘मोह’ सुटेना | ‘आर्थिक’ राजधानीत सगळी ‘प्रतिभा’ पणाला लावून महत्वाची खाती मिळण्याची “आशा”!

Ganesh Kumar Mule Jun 02, 2025 8:58 PM

Metro | Shivsena | पुणे मेट्रोचे स्ट्रक्चरल व फायर ऑडिट करा | शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ची मागणी
Lohgaon-Wagholi water project | लोहगावकरांचा पाणी प्रश्न अखेर सुटणार | 283 कोटींच्या पाणी योजनेला मंजुरी | आमदार सुनिल टिंगरे यांची माहिती
Maharashtra Bhushan | पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी समाजासाठी काम करण्याची शिकवण दिली | केंद्रीय मंत्री अमित शहा

PMC Officers | वारंवार बदली होऊनही काही अधिकाऱ्यांना पुणे महापालिकेचा ‘मोह’ सुटेना | ‘आर्थिक’ राजधानीत सगळी ‘प्रतिभा’ पणाला लावून महत्वाची खाती मिळण्याची “आशा”!

| नुकतेच बदल्या झालेल्या अधिकाऱ्यांची पुन्हा महापालिकेत येण्यासाठी फिल्डिंग!

| महत्वाच्या खात्यांसाठी सुरू आहे लॉबिंग

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – राज्य सरकारने शहरी भागातील अधिकाऱ्यांच्या नुकत्याच बदल्या केल्या आहेत. यातील पुणे महापालिकेतील उपायुक्त स्तरावरील अधिकाऱ्यांचा समावेश होता. मात्र यातील काही अधिकारी जे बदली होऊन पुन्हा महापालिकेत येतात, तेच अधिकारी पुन्हा महापालिकेत येण्यासाठी फिल्डिंग लावून बसले आहेत. विशेष म्हणजे महापालिकेतील महत्वाच्या खात्या साठी हे अधिकारी लॉबिंग करत असून देशाच्या आर्थिक राजधानीत याबाबत आर्थिक देवाण घेवाण बाबत चर्चा देखील सुरू असल्याची माहिती राजधानीतील उच्चपदस्थ प्रशासकीय सुत्रांनी दिली. (Pune Municipal Corporation – PMC)

महापालिकेत राज्य सरकार कडून प्रति नियुक्ती वर अधिकारी नियुक्त केले जातात. त्यांचा कालावधी संपल्यानंतर त्यांची बदली केली जाते. मात्र गेल्या काही वर्षापासून पुणे महापालिकेत चुकीचा पायंडा पडत आहे. कारण बदली केल्यानंतर काही अधिकारी पुन्हा महापालिकेत येतात. यासाठी राजकीय दबाव आणि आर्थिक वजन देखील वापरले जाते. हाच पायंडा पुन्हा एकदा पडताना दिसतो आहे. कारण राज्य सरकारने नुकत्याच काही अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. मात्र यातील काही अधिकाऱ्यांना पुणे महापालिकेचा मोह सुटताना दिसत नाही. या अगोदर दोनदा बदली होऊन देखील हे अधिकारी पुन्हा महापालिकेत आले होते. त्यानंतर आता बदली झाली तरी ते पुनः महापालिकेत येण्यासाठी फिल्डिंग लावून बसले आहेत.

विशेष म्हणजे यासाठी मुंबई दरबारी राजकीय वजन वापरून आर्थिक देवाण घेवाण केली जात असल्याची देखील चर्चा आहे. शिवाय पुणे महापालिकेतील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचे या अधिकाऱ्यांना पाठबळ असल्याचे उघड दिसत आहे. कारण या अधिकाऱ्यांची बदली होऊन देखील  आज चार वाजता महापालिका भवनात चौथ्या मजल्यावर पुष्पगुच्छ घेऊन अचानक प्रकट झाले होते. शिवाय त्यांचा आविर्भाव हा आपण पुणे महापालिकेत उपायुक्त असल्याचाच होता. यापुढे जाऊन विशेष  हे कि या अधिकाऱ्यांना पुणे महापालिकेतील महत्वाची समजली जाणारी अशाच  खात्यांचा मोह आहे.

महापालिका निवडणूक काही दिवसावर येऊन ठेपली आहे. अशा वेळी निवडणूक आयोगाच्या नियमानुसार एकाच जिल्ह्यात तीन वर्षापेक्षा अधिक काळ नोकरी  करणाऱ्या अधिकाऱ्यांना तत्काळ बदलले जाते. असे असतानाही हे अधिकारी निर्धास्तपणे फिल्डिंग लावताना दिसत आहेत.  मात्र असे असले तरी नवनियुक्त आयुक्त नवल किशोर राम अशा गोष्टींना थारा देणार नाहीत. अशी चर्चा महापालिकेत आहे. कारण आयुक्त हे प्रधानमंत्री कार्यालयातून थेट महापालिकेत आले आहेत. शिवाय निवडणूक जवळ आली आहे. त्यामुळे आयुक्त या अधिकाऱ्यांची फिल्डिंग खपवून घेणार नाहीत, असे बोलले जात आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: