Kothrud News | कोथरूड मधील नालेसफाई आणि रस्त्याचे काम निकृष्ट करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाका | राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार कोथरूड विधानसभेची मागणी
Girish Gurnani – (The Karbhari News Service) – राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार कोथरूड विधानसभेच्या वतीने कोथरूड क्षेत्रीय कार्यलय प्रमुख विजय नायकल साहेब यांची भेट घेण्यात आली. कोथरूड मध्ये नुकताच पाऊस झाला व या पावसात रस्त्यात तुडुंबं भरलेले पाणी आंम्हा सर्व कोथरूडकरांना पहायला मिळाले व त्यातूनच रस्त्याला झालेले ट्रॅफिक, आत्ताच केलेल्या रस्त्याची झालेली चाळन, चेंबर्स मधून येणारे घाण पाणी हे सुद्धा कोथरूडकरांनी पाहिले. (Kothrud Ward Office)
या सर्व उपयोजना पावसाच्या आगोदर करणे अपेक्षित होत परंतु आपणाकडून व कॉन्ट्रॅक्टदाराकडून हीं सर्व कामे पूर्ण झालेली नाही त्यामुळेच कोथरूडकरांना या सर्व गोष्टींचा नाहक त्रास सहन करावा लागला.
तरी पुन्हा एकदा कोथरूडकरांच्या वतीने सांगण्यात येते की, आपण निकृष्ट दर्जाचे केलेल्या रस्त्याचे काम, नालेसफाईचे काम हे आता तरी पूर्ण करून घ्यावे जेणेकरून कोथरूडकरांना अजून अडचणी सहन कराव्या लागणार नाही. असे गिरीश गुरनानी यांनी म्हटले आहे.
—-
नालेसफाई आणि निकृष्ट दर्जाचे रस्ते या मध्ये कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून मोठा भ्रष्टाचार झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आपण नालेसफाई व रस्ते कॉन्ट्रॅक्टदारांना तात्काळ ब्लॅकलिस्ट मध्ये टाकून त्यांच्यावर योग्य ती कारवाही करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल.
– गिरीश गुरनानी, अध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार कोथरूड विधानसभा
COMMENTS