PMC Municipal Secretary Department | नगरसचिव विभागात बदली करून घेण्यास कर्मचाऱ्यांची टाळाटाळ | आदेश देऊनही कर्मचारी हजर होईनात

Homeadministrative

PMC Municipal Secretary Department | नगरसचिव विभागात बदली करून घेण्यास कर्मचाऱ्यांची टाळाटाळ | आदेश देऊनही कर्मचारी हजर होईनात

Ganesh Kumar Mule Feb 14, 2026 7:58 PM

Opportunity for PMC employees to do various courses! | Benefit for salary increase and promotion!
PMC Employees | PMC मधील रिक्त पदांचा डोंगर उघड – १२ वर्षांपासून सरळसेवेची भरतीच नाही! – PMC एम्प्लॉईज युनियन
PMC CHS Health Scheme | अंशदायी वैद्यकीय सहाय्य योजनेच्या औषध बिलांबाबत आरोग्य विभागाकडून नवीन नियमावली

PMC Municipal Secretary Department | नगरसचिव विभागात बदली करून घेण्यास कर्मचाऱ्यांची टाळाटाळ | आदेश देऊनही कर्मचारी हजर होईनात

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – महापालिका निवडणूक झाल्यानंतर आता महापालिका सभागृह अस्तित्वात आले आहे. महापौर आणि नगरसेवक यांची आता महापालिका भवनात लगबग सुरू झाली आहे. हे सर्व व्यवस्थापन करण्यासाठी नगरसचिव विभागाची कसरत असणार आहे. त्यासाठी विभागाने सामान्य प्रशासन विभागाकडे अतिरिक्त कर्मचाऱ्यांची मागणी केली होती. त्यानुसार विभागाला 38 कर्मचारी देण्यात आले. मात्र हे कर्मचारी नगरसचिव विभागाकडे रुजू होण्यास टाळाटाळ करत आहेत. त्यामुळे आता सामान्य प्रशासन विभागाने कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. (PMC Employees Transfer)

महापालिका सभागृह आणि महापौर कार्यालय यांचे सर्व नियोजन हे नगरसचिव विभाग करतो. प्रशासक असताना विभागातील कर्मचारी इतर ठिकाणी बदलण्यात आले होते. सभागृह अस्तित्वात येण्या अगोदर हे कर्मचारी माघारी बोलवण्यात आले होते. शिवाय नुकतीच नगरसचिव अतिरिक्त कर्मचाऱ्यांची मागणी सामान्य प्रशासन विभागाकडे केली होती. त्यानुसार ३८ कर्मचाऱ्यांच्या बदल्या नगरसचिव विभागाकडे करण्यात आल्या आहेत. मात्र यापैकी १७ कर्मचारी अजूनही विभागात रुजू झाले नाहीत. त्यामुळे या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची शिफारस नगरसचिव विभागाने केली आहे. त्यानुसार सामान्य प्रशासन विभागाने कारवाई करण्याचा इशारा रुजू न झालेल्या कर्मचाऱ्यांना दिला आहे.

या कर्मचाऱ्यांमध्ये शिपाई आणि बिगारी यांची संख्या जास्त आहे. विभागाकडे आता जास्त काम असणार आहे, त्यामुळे हे कर्मचारी टाळाटाळ करत आहेत, अशी चर्चा केली जात आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: