PMC Employees Promotion | स्नेहल हरपळे यांना उद्यान अधिक्षक पदावर पदोन्नती!
| शहर सुधारणा समितीची मंजूरी
PMC Garden Department – (The Karbhari News Service) – महापालिका उद्यान विभागाकडील सहायक उद्यान अधिक्षक स्नेहल हरपळे यांना उद्यान अधिक्षक (श्रेणी १) या पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. या पदोन्नतीने त्यांचे पे मॅट्रिक्स हे S १५ वरून S २३ असे झाले आहे. या बाबतच्या प्रस्तावाला नुकतीच शहर सुधारणा समितीने मान्यता दिली आहे. आता हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी मुख्य सभेसमोर ठेवला जाईल. (Pune PMC News)
उद्यान अधिक्षक श्रेणी १ हे पद सहायक उद्यान अधीक्षक श्रेणी २ या अधिकाऱ्यांमधून सेवाज्येष्ठतेने भरले जाते. पुणे महापालिका सुधारित आकृतीबंधनुसार उद्यान अधिक्षक श्रेणी १ ची तीन पदे मंजूर आहेत. 100% पदोन्नती नुसार यातील २ पदे भरण्यात आली असून १ पद रिक्त आहे.
राज्य सरकारच्या मंजूर अर्हतेनुसार या पदासाठी कृषी विद्यापीठाची बीएससी (हॉर्टिकल्चर/बोटॅनी/फॉरेस्ट ) पदवी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच सहायक उद्यान अधिक्षक पदावर तीन वर्ष काम केल्याचा अनुभव असणे आवश्यक आहे.
त्यानुसार यासाठी पात्र स्नेहल हरपळे यांची शिफारस बढती समितीने केली होती. त्यानुसार हा प्रस्ताव शहर सुधारणा समिती समोर ठेवण्यात आला होता. या प्रस्तावाला समितीने मंजुरी दिली आहे. आता हा प्रस्ताव मुख्य सभेसमोर ठेवण्यात आला आहे.

COMMENTS