PMC Chhatrapati Sambhaji Garden | डेलिया, आर्किड, जरबेरा, गुलाब, कार्नेशन ची फुलझाडे, देखावे तसेच फुलांच्या कलाकृती  पाहण्यास छत्रपती संभाजी उद्यानात जा | आज आणि उद्या दोन दिवस प्रदर्शन 

Homeadministrative

PMC Chhatrapati Sambhaji Garden | डेलिया, आर्किड, जरबेरा, गुलाब, कार्नेशन ची फुलझाडे, देखावे तसेच फुलांच्या कलाकृती  पाहण्यास छत्रपती संभाजी उद्यानात जा | आज आणि उद्या दोन दिवस प्रदर्शन 

Ganesh Kumar Mule Feb 14, 2026 9:18 PM

  Be careful if you harm the tree for Holi!  The fine can be up to 1 lakh!  |  Warning of Garden Department of Pune Municipal Corporation
PMC 74th Anniversary | पुणे महापालिकेच्या 42 व्या फळे, फुले व भाजीपाला प्रदर्शनाचे उदघाटन आयुक्त विक्रम कुमार यांच्या हस्ते संपन्न! 
PMC Anniversary Exhibition Award | पुणे महापालिकेच्या 42 व्या फळे, फुले व भाजीपाला प्रदर्शनात हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पो. लि. ला प्रथम पारितोषिक! 

PMC Chhatrapati Sambhaji Garden | डेलिया, आर्किड, जरबेरा, गुलाब, कार्नेशन ची फुलझाडे, देखावे तसेच फुलांच्या कलाकृती  पाहण्यास छत्रपती संभाजी उद्यानात जा | आज आणि उद्या दोन दिवस प्रदर्शन

PMC Garden Department – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिका उद्यान विभाग व वृक्ष प्राधिकरण यांचे विद्यमाने ४४ वे फळे, फुले व भाजीपाला प्रदर्शन तसेच बाग व वृक्ष संवर्धन स्पर्धा  छत्रपती संभाजीराजे उद्यान, येथे आयोजित करण्यात आलेले आहे.  प्रदर्शनाचे उदघाटन   परशुराम वाडेकर, उपमहापौर, गणेश बिडकर, सभागृह नेता, सोपान (काका) चव्हाण, गटनेते, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष व स्नेहा माळवदे, सदस्य, पुणे महानगरपालिका व  नवल किशोर राम, महापालिका आयुक्त पुणे महानगरपालिका यांच्या हस्ते संपन्न झाला. (PMC Anniversary)

प्रदर्शन सर्व नागरिकांना आज पासून  १५  पर्यंत रात्री ९.०० वा. वाजेपर्यंत सर्वासाठी मोफत खुले राहील. तरी सर्व नागरिकांनी  प्रदर्शनाचा जास्त लाभ घ्यावा,  असे आवाहन सह महापालिका आयुक्तडॉ. अशोक दि. घोरपडे यांनी केले आहे.

कार्यक्रमास  पृथ्वीराज बी.पी., अतिरिक्त महापालिका आयुक्त (इस्टेट),  ओमप्रकाश दिवटे, अतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष), डॉ.अशोक दि. घोरपडे, सह महापालिका आयुक्त तसेच संतोषकुमार कांबळे, उद्यान अधिक्षक,  स्नेहल हरपळे, उद्यान अधिक्षक,  राहुल साळुंके, कार्यकारी अभियंता, उद्यान विभाग तसेच उद्यान विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

प्रदर्शनामध्ये महाराष्ट्र राज्याचे उप मुख्यमंत्री स्व. अजित आशाताई अनंतराव पवार यांना रांगोळीद्वारे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

स्पर्धेमध्ये प्रामुख्याने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ – वनस्पतीशास्त्र विभाग, औषधी वनस्पती संग्रह्,घनकचरा विभाग, पुणे मनपा, पर्यावरण केंद्र, पुष्करणी, निसर्ग सेवक, टिळक आयुर्वेद महाविद्यालय, फ्रेंड्स ऑफ बोन्साय, ब्रम्ह कुमारीज विश्व विद्यालय व पर्यावरणावर काम करणाऱ्या विविध स्वयंसेवी संस्था सहभागी झालेल्या असून या प्रदर्शनामध्ये बोन्साय, फीचर्स गार्डन, पुष्करणीच्या विविध पुष्परचना तसेच उद्यान विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी तयार केलेले विविध देखावे तसेच फुलांच्या कलाकृती नागरिकांना पहावयास मिळेल तसेच फ्लेमिंगो बाग,टाकाऊ टायर पासून कलाकृती, बिबट्याचा मानवी वस्तीत अधिवास देखावा, लाकडाच्या वस्तू पासून कलाकृती, नक्षत्र उद्यान, झेन गार्डन, फुलांची बग्गी, प्लास्टिक बॉटल्सपासून कलाकृती, परसबाग व फळांचे घर, फुलांपासून फुलपाखरू कलाकृती, वंदेमातरम् गीताच्या १५० व्या वर्धापन दिनानिमित्ताने भारतमाता कलाकृती, वॉटरफॉल फिचर गार्डन अशा विविध तयार करण्यात आलेल्या आहेत.

प्रदर्शनामध्ये वेगवेगळे एकूण २६६ विभाग आहेत. त्यामध्ये शोभिवंत पानाफुलांच्या कुंड्यांची मांडणी, औषधी वनस्पतींचा संग्रह, गुलाब पुष्पांची मांडणी, हंगामी फुले, टेबल सजावट, वेगवेगळ्या प्रकारची फुले, भाजीपाला, सॅलेड डेकोरेशन, बचत गटातील महिलांसाठी, फळे – भाजीपाल्यावर प्रक्रिया करून तयार केलेले पदार्थ, विविध प्रकारचे हार, पुष्पगुच्छ, शिप, वेण्या प्रदर्शनात मांडण्यात आलेले आहेत.तसेच निसर्ग व पर्यावरणावर आधारित छायाचित्रांसाठी स्वतंत्र विभाग ठेवण्यात आलेले आहेत. विविध प्रकारचे डेलिया, आर्किड, अॅन्थुरिअम, जरबेरा, गुलाब, कार्नेशन इ. प्रकारची हंगामी तसेच बहुवार्षिक फुलझाडे या प्रदर्शनातील प्रमुख आकर्षण आहे. या प्रदर्शनामध्ये विविध प्रकारच्या उद्यानांच्या प्रतिकृती पाहण्यासाठी तयार करण्यात आलेल्या आहेत. सदर प्रदर्शनानिमित्ताने घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमध्ये ११०० स्पर्धकांनी विविध विभागामध्ये एकूण २४८० इतक्या प्रवेशिका घेतलेल्या आहेत.

 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: