PMC JE Bharti News | कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) भरती प्रक्रियेतील पात्र उमेदवारांच्या कागदपत्रांची उद्यापासून पडताळणी   | ५४५ उमेदवार पात्र

Homeadministrative

PMC JE Bharti News | कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) भरती प्रक्रियेतील पात्र उमेदवारांच्या कागदपत्रांची उद्यापासून पडताळणी  | ५४५ उमेदवार पात्र

Ganesh Kumar Mule Jun 23, 2026 8:01 PM

Pune PMC News | छपाई कामासाठी लागणारे रील पेपर, कार्डशीट पेपर खरेदी प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा तुषार पाटील यांचा आरोप  | मागील वर्षीच्या टेंडर प्रमाणेच टेंडर लावल्याचा उपायुक्त यांचा खुलासा 
PMC Sport Scholarship | पुणे महानगरपालिके कडून ३४४ खेळाडूना  क्रीडा शिष्यवृत्ती प्रदान 
Pune PMC News | खाऊ पासून मुले वंचित राहणर नाहीत  | उपायुक्त किशोरी शिंदे यांची माहिती 

PMC JE Bharti News | कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) भरती प्रक्रियेतील पात्र उमेदवारांच्या कागदपत्रांची उद्यापासून पडताळणी

| ५४५ उमेदवार पात्र

| महापालिका कर्मचाऱ्यांची १२  छाननी पथके नियुक्त

 

PMC JE Recruitment 2026 – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिकेच्या कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) वर्ग-३ या १६९ पदांच्या भरतीसाठी पात्र ठरलेल्या ५४५ उमेदवारांच्या कागदपत्र पडताळणीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. ही प्रक्रिया २४, २५, २९ आणि ३० जून २०२६ रोजी महापालिकेच्या मुख्य इमारतीतील जी.बी. हॉल, तिसरा मजला पुणे येथे होणार आहे. अशी माहिती उपायुक्त किशोरी शिंदे यांनी दिली. (PMC Junior Engineer Bharti 2026)

पडताळणी प्रक्रिया चार दिवस चालणार आहे. २४ ला १०० उमेदवार, २५ ला १५०, २९ ला १५० आणि ३० ला १४५ उमेदवारांना बोलावण्यात आले आहे. याबाबतची माहिती विद्यार्थ्यांना मेल द्वारे देण्यात आली आहे. महापालिका वेबसाइट वर देखील ही माहिती प्रसारित करण्यात आली आहे.

पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील अभियात्रिकी संवर्गातील कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) वर्ग-३ या १६९ रिक्त पदांच्या भरती प्रक्रियेला गती मिळाली आहे. उमेदवारांच्या शैक्षणिक आणि इतर पात्रता कागदपत्रांच्या पडताळणीसाठी महापालिकेने छाननी पथक नियुक्त केले आहे.

महापालिकेने ९ ऑक्टोबर २०२५ रोजी सुधारित जाहिरात  प्रसिद्ध करून या पदांसाठी अर्ज मागवले होते. या भरतीसाठी तब्बल ४१ हजार २७२ उमेदवारांनी अर्ज सादर केले होते. IBPS संस्थेमार्फत २२, २३ आणि २९ एप्रिल २०२६ रोजी या पदांसाठी ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली. परीक्षेचा निकाल ९ जून २०२६ रोजी पुणे महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.

आता ऑनलाईन परीक्षेत उमेदवारांना मिळालेल्या गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार अंतिम निवड यादी प्रसिद्ध करण्यापूर्वी, संबंधित उमेदवारांची शैक्षणिक व इतर अहर्ता/पात्रतेबाबतची मूळ प्रमाणपत्रे आणि कागदपत्रांची तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी छाननी पथक नियुक्त करण्यात आले आहे. एकूण १२ पथके तयार करण्यात आली आहेत. प्रत्येक पथकात ४ कर्मचारी असणार आहेत. या कर्मचाऱ्यांचे आज प्रक्षिक्षण घेण्यात आले.

ही छाननी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच अंतिम निवड यादी जाहीर केली जाणार आहे. महापालिकेच्या प्रशासन विभागाकडून या संदर्भातील कार्यालयीन आदेश नुकताच जारी करण्यात आला आहे.

महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार, २४ जून रोजी अनु. क्र. १ ते १०० आणि २५ जून ला अनु. क्र. १०१ ते २५० या क्रमांकांच्या उमेदवारांची पडताळणी होईल. तर २९ जून रोजी अनु. क्र. २५१ ते ४०० आणि ३० जून ला अनु. क्र. ४०१  ते ५४५ या उमेदवारांची कागदपत्रे तपासली जातील.

पडताळणीसाठी उमेदवारांनी अर्जासोबत सादर केलेल्या सर्व मूळ प्रमाणपत्रे आणि कागदपत्रे सोबत आणणे अनिवार्य आहे. त्यात शैक्षणिक अर्हता, वय, आरक्षण, अनुभव, ओळखपत्र आणि इतर संबंधित कागदपत्रांचा समावेश आहे.

महापालिकेने स्पष्ट केले आहे की, पडताळणीसाठी गैरहजर राहिलेल्या उमेदवारांचा पुढील प्रक्रियेसाठी विचार केला जाणार नाही. तसेच कोणत्याही प्रकारची वेळ किंवा तारीख बदलून मिळणार नाही.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: