Pune Water Supply | पुण्यात काही भागात 2 दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा

Homeadministrative

Pune Water Supply | पुण्यात काही भागात 2 दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा

Ganesh Kumar Mule Aug 01, 2026 5:15 PM

Pune Water Supply Charges | पुणे महापालिकेकडे जलसंपदा विभागाची कुठलीही थकबाकी नाही! | पुणे महापालिकेने राज्य सरकारला सादर केला आपला अभिप्राय
MLA Hemant Rasane | अनियमित पाणी पुरवठ्याची तक्रारी, आमदार रासने पहाटेच पोहचले नागरिकांच्या दारात
Pune Water Cut | येत्या मंगळवारी शहराच्या काही भागात दिवसभर पाणीपुरवठा बंद |  बुधवारी कमी दाबाने पाणी  

Pune Water Supply | पुण्यात काही भागात 2 दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा

| जुने पर्वती जलशुद्धीकरण केंद्रातील गळतीमुळे पेठ, शिवाजीनगर, एरंडवणे भागाला फटका

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – पुणे शहरातील काही भागातील नागरिकांना पुढील दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा सहन करावा लागणार आहे. जुने पर्वती जलशुद्धीकरण केंद्रास पाणी आणणाऱ्या मुख्य पाईपलाईनमध्ये गळती झाल्यामुळे महापालिकेला सदर केंद्र तात्पुरते बंद करावे लागले आहे. (PMC Water Supply Department)

पुणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, जुने पर्वती जलशुद्धीकरण केंद्रास येणाऱ्या 1200 मि.मी. व्यासाच्या रॉ वॉटर लाईनच्या इनलेट चेंबरमध्ये गळती आढळून आली. या गळतीमुळे जलशुद्धीकरण केंद्राची कार्यक्षमता बाधित होत असल्याने खबरदारी म्हणून ते तात्पुरते बंद करण्यात आले आहे.

सदर गळती दुरुस्त करण्याचे काम महापालिकेच्या यंत्रणेकडून युद्धपातळीवर सुरू आहे. या कामासाठी अंदाजे 8 तासांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. दुरुस्तीचे काम पूर्ण होताच जुने पर्वती जलशुद्धीकरण केंद्र तात्काळ पुन्हा कार्यान्वित करण्यात येणार आहे, असे मुख्य अभियंता, पाणी पुरवठा विभाग यांनी स्पष्ट केले आहे.

*कोणत्या भागात होणार परिणाम?*
या बिघाडामुळे दि. 1 ऑगस्ट 2026 आणि दि. 2 ऑगस्ट 2026 या दोन दिवसांमध्ये खालील भागांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे.
1. पेठ परिसर
2. शिवाजीनगर
3. एरंडवणे
4. औंध
5. बोपोडी
6. वरील परिसराला लागून असलेले इतर भाग

पाणीपुरवठ्यात होणाऱ्या या व्यत्ययाबद्दल पुणे महानगरपालिकेने नागरिकांची दिलगीरी व्यक्त केली आहे. तसेच नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करून महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर पाणीपुरवठा पूर्ववत सुरू होईल. अधिक माहितीसाठी नागरिकांनी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाशी संपर्क साधावा.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: