PMC IT Department | समाविष्ट गावातील संगणक प्रणाली होणार अपडेट! | प्रशासकीय कामकाजात येणार गतिमानता!
PMC Merged Villages – (The Karbhari News Service) – महापालिका हद्दीत (PMC Limits) समाविष्ट झालेल्या ३२ गावातील संगणक प्रणाली अपडेट केली जाणार आहे. त्यामुळे प्रशासकीय कामकाजात गतिमानता येणार आहे. याबाबतचे काम मोनार्च टेक्नॉलॉजी प्रा लि या कंपनीस देखभाल आणि दुरुस्तीसह पाच वर्षासाठी दिले जाणार आहे. त्यासाठी ६ कोटी ४० लाख इतका खर्च येणार आहे. या बाबतच्या प्रस्तावा ला स्थायी समितीने नुकतीच मान्यता दिली आहे. (“Selection of Service provider for Supply, Installation, Testing and Commissioning Operation and Maintenance of Network Infrastructure in 32 Villages and other 16 location of PMC for a period of 5 years.)
पुणे महानगरपालिकेतील मुख्यभवन, १५ क्षेत्रीय कार्यालय व संपर्क कार्यालय तसेच विविध महत्वाच्या कार्यालयातील सर्व संगणक LAN व WAN द्वारे नेटवर्कमध्ये जोडण्यात आले आहेत. ही सर्व कार्यालय बीएसएनएल डेटा लिज लाईन द्वारा मुख्य भवनला जोडण्यात आलेली आहे. तसेच इंटरनेटचे सुविधेसाठी बीएसएनएल व व्होडाफोन कंपनी द्वारे प्रत्येकी २०० एमबीपीएस असे एकूण ४०० एमबीपीएसची इंटरनेट लिजलाईन सुविधा घेण्यात आलेली आहे. ई गव्हर्नन्स प्रकल्पाच्या माध्यमातून कार्यालयीन कामकाजात सूसुत्रता व सुलभता येणे कामी विविध विभागामार्फत ऑनलाईन संगणक प्रणालीचा मोठ्या प्रमाणात कामकाज करण्यात येत आहे. (Pune PMC News)
पुणे महानगरपालिकेतील विविध ऑनलाईन संगणक प्रणालीसाठी आवश्यक असलेली इंटरनेट सुविधा पुरविण्यासाठी Cisco कोअर राउटर व अॅक्टिव्ह स्विच वापरून मॅनेजड नेटवर्क ऑपरेटिंग सेटअप तयार करून पुणे मनपातील नेटवर्कचे कामकाज केंद्रीय पद्धतीने नियंत्रित करण्यात येत आहे. या नेटवर्कच्या सेटअपमुळे ऑनलाईन संगणक प्रणालीच्या अंमलबजावणीसाठी प्रशासकीय कामकाजात गतिमानता येऊन नागरी सुविधा त्वरित पूरविण्यास मदत होत आहे. तसेच Fortinet फायरवॉलमुळे सर्व कार्यालयातील संगणकांना इंटरनेट सुविधा नियंत्रित व सुरक्षितपणे पुरविणे शक्य होत आहे.
पुणे महानगरपालिकेचा नव्याने झालेल्या विस्तारामुळे एप्रिल २०१८ पासून ११ गावे व एप्रिल २०२२ पासून २३
गावांचा असे एकूण ३४ गावे समाविष्ट झाली आहेत. सद्यस्थितीत तेथे ग्रामपंचायत मधील उपलब्ध संगणक व नव्याने देण्यात आलेल्या संगणकावर फक्त प्रॉपर्टी टॅक्स खात्यातील कामकाज करण्यात येत आहे. तेथे स्थानिक ब्रॉडबँड कनेक्टीव्हिटीद्वारा इंटरनेटची सुविधा घेण्यात आलेली आहे. SD Wan द्वारे सदरची सर्व गावामधील संगणक पुणे महानगरपालिकेच्या नेटवर्क इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये समाविष्ट करणे शक्य होणार आहे. त्यामुळे पुणे महानगरपालिकेतील कामकाजातील उदा FTS, Payroll- Pension, E-Office, I-WMS, Shree-Lipi युनिकोड या ऑनलाईन संगणक प्रणालीचा वापर करणे शक्य होणार आहे.
तसेच पुणे मनपातील Fortinet फायरवॉलमुळे तेथील इंटरनेट सुविधा व Bid Document या Anti-Virus चा वापर करून तेथील संगणकाचे कामकाज सुरक्षित ठेवता येणार आहे. यामुळे पुणे महानगरपालिकेच्या सर्व विभागातील प्रशासकीय कामकाज करणे शक्य होणार आहे व तेथील नागरिकांना पुणे महानगरपालिकेतील सर्व नागरी सुविधांचा फायदा पोहचविणे शक्य होणार आहे.
या प्रकल्पाच्या कामकाजासाठी पुणे महानगरपालिकेचे तांत्रिक सल्लागारErnst and Young यांच्याकडून अहवाल घेण्यात आला होता. प्रस्तावित प्रकल्पातील ३४ गावातील ३८ ठिकाणी व इतर १६ ठिकाणी Sdwan कनेक्टीव्हीटीसोबत नेटवर्क इन्फ्रास्ट्रक्चरसाठी एकाच ठेकेदाराकडून पुढील ५ वर्षासाठी सर्वसमावेशक नियंत्रित करण्यासाठी कामकाज करून घेणे सोयीचे कमी खर्चिक व फायदेशीर ठरणार आहे.
त्यानुसार B2 पद्धतीने ५ वर्षाकरिता महाटेंडर पोर्टलद्वारे राबविण्यासाठीची प्रक्रिया करण्यात आली. त्यानुसार ३ कंपन्या आल्या होत्या. त्यातील मोनार्च कंपनीचा कमी दर असल्याने काम देण्यात आले आहे.
—-
समाविष्ट गावात संगणक प्रणाली अपडेट नसल्याने कामकाजात अडचणी येत होत्या. शिवाय कामकाजात गती नव्हती. मात्र आता ही प्रणाली LAN आणि WAN द्वारे जोडली जाणार आहे. यामुळे कामकाज सुलभ होऊन त्यात गती येणार आहे.
– राहूल जगताप, सिस्टीम मॅनेजर, पुणे महापालिका.
COMMENTS