Pune Propety Tax | पुणे महापालिकेच्या  कर आकारणी व कर संकलन विभागाचा नवा विक्रम: ५८ दिवसांत १००० कोटींचा टप्पा पार

Homeadministrative

Pune Propety Tax | पुणे महापालिकेच्या  कर आकारणी व कर संकलन विभागाचा नवा विक्रम: ५८ दिवसांत १००० कोटींचा टप्पा पार

Ganesh Kumar Mule May 28, 2026 8:23 PM

PMC Employees Salary | महापालिका अधिकारी, कर्मचारी यांचे  वेतन १ तारखेला जमा न झाल्यास,  खातेप्रमुख व बिल लेखनिक यांना जबाबदार धरणार | महापालिका अतिरिक्त आयुक्तांचा इशारा 
Shasan Aapalya Dari | शासन आपल्या दारी कार्यक्रमात  पुणे जिल्ह्यातील २२ लाख नागरिकांना लाभ
Nanded City Property tax PMC | नांदेड सिटी टाऊनशिप मधील लोकांना कर भरावा लागणार | महापालिकेकडून कर आकारणी सुरु | 30 जानेवारी पर्यंत PT3 अर्ज भरून देण्यासाठी मुदत

Pune Property Tax | पुणे महापालिकेच्या  कर आकारणी व कर संकलन विभागाचा नवा विक्रम: ५८ दिवसांत १००० कोटींचा टप्पा पार

| उपायुक्त रवी पवार यांची माहिती

 

PMC Property Tax Department – (The Karbhari News Service) –   पुणे महानगरपालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाने चालू आर्थिक वर्षात इतिहास रचला आहे. केवळ ५८ दिवसांत १००० कोटींचा मालमत्ता कर वसूल करून विभागाने उच्चांकी भरण्याची नोंद केली आहे. उपायुक्त रवी पवार यांनी सूक्ष्म नियोजनामुळे हा विक्रम शक्य झाल्याचे सांगितले. (Pune Municipal Corporation Property tax Department)

१ एप्रिल पासून २८ मे  पर्यंतच्या ५८ दिवसांच्या कालावधीत महापालिकेच्या तिजोरीत १००१.९६ कोटी रुपयांचा मालमत्ता कर जमा झाला आहे. गेल्यावर्षी याच कालावधीत १ एप्रिल २०२५ ते २८ मे २०२५ दरम्यान ४५५.८५ कोटी रुपये जमा झाले होते. म्हणजेच यंदा दुपटीहून अधिक म्हणजे १२०% वाढ नोंदवण्यात आली आहे.

२८ मे २०२६ रोजी एकाच दिवशी ३०.५२ कोटी रुपयांचा मालमत्ता कर जमा झाला. गेल्यावर्षी २८ मे २०२५ रोजी ही रक्कम २१.०८ कोटी होती. एका दिवसाच्या वसुलीतही सुमारे ४५% वाढ झाली आहे.

ऑनलाइन भरण्याकडे नागरिकांचा कल
उपायुक्त रवी पवार म्हणाले, “सूक्ष्म नियोजन, कर्मचाऱ्यांचे परिश्रम आणि नागरिकांचा वाढता प्रतिसाद यामुळे हा टप्पा गाठता आला. प्रथमच केवळ ५८ दिवसांत १००० कोटीचा टप्पा पार झाला आहे.” आकडेवारीनुसार ७२% नागरिकांनी ऑनलाइन पद्धतीने कर भरला असून त्यातून एकूण वसुलीच्या ६५% म्हणजे ६५५.५४ कोटी रुपये जमा झाले आहेत.

पहिल्या दोन महिन्यांतच १००० कोटींचा टप्पा पार झाल्याने उद्दिष्ट गाठणे सोपे होणार आहे. लवकर कर भरणाऱ्यांसाठी ५% ते १०% सवलत योजना, जनजागृती मोहीम आणि ऑनलाइन प्रणाली अधिक सुलभ केल्याने वसुली वाढल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.

दरम्यान, ३१ मे पर्यंत कर भरणाऱ्या नागरिकांना सामान्य करात सवलत मिळणार असल्याने येत्या ३ दिवसांत वसुलीचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

ऑनलाइन पेमेंट: सर्वाधिक नागरिकांनी ऑनलाइन पद्धतीला पसंती दिली आहे. एकूण व्यवहारांपैकी ७२% म्हणजे ४,०४,६६४ नागरिकांनी ऑनलाइन कर भरला असून त्यातून ६५५.५४ कोटी रुपये जमा झाले आहेत. ही रक्कम एकूण वसुलीच्या ६५% आहे.

चेकद्वारे भरणा: ६०,११८ नागरिकांनी म्हणजेच ११% करदात्यांनी चेकद्वारे कर भरला आहे. चेकद्वारे २६१.८८ कोटी रुपये जमा झाले असून एकूण वसुलीत त्याचा वाटा २६% आहे.

रोख भरणा: ९४,३२६ नागरिकांनी म्हणजेच १७% करदात्यांनी रोख रकमेतून कर भरला आहे. रोखीने ८४.५१ कोटी रुपये जमा झाले असून एकूण वसुलीच्या केवळ ८% रक्कम रोखीने आली आहे.

 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: