RMS Sunil Shinde | राष्ट्रीय मजदूर संघाचं एक दिवसीय शिबीर संपन्न | कंत्राटी कामगारांच्या हक्कांबाबत मार्गदर्शन
Pune News – (The Kabhari News Service) – राष्ट्रीय मजदूर संघ आयोजित पुणे महानगरपालिकेतील कंत्राटी कामगारांचे एक दिवसीय शिबीर आयुर्वेद रसशाळा येथे संघटनेच्या कार्यलयात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.
शिबिराच्या दरम्यान कामगारांकडून अनेक महत्त्वाचे प्रश्न मांडण्यात आले — “अर्धकुशल कामगारांना रजावेतन किती?”, “कुशल कामगारांना घरभाडे किती मिळते?”, “अकुशल कामगारांना बोनस किती?”, तसेच राष्ट्रीय सणांच्या सुट्टीच्या दिवशी काम केल्यास पगारी रजा की दुप्पट वेतन? अशा अनेक व्यवहार्य व हक्कांसंबंधी मुद्द्यांवर चर्चा झाली.
या शिबिरात संघटनेचे व कामगार नेते सुनील शिंदे यांनी 13 ऑक्टोबर रोजी पुणे महानगरपालिकेकडून प्रसिद्ध झालेल्या परिपत्रकाबाबत सविस्तर माहिती दिली. त्यांनी किमान वेतन कायदा, त्यानुसार मिळणारे बोनस, रजावेतन व घरभाडे, तसेच कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ESIC) कार्ड, प्रोविडेंट फंड आणि पगार स्लिप समजून घेण्याचे मार्गदर्शन दिले.
शिबिराच्या शेवटी उपस्थित कामगारांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले — “दहा वर्षे काम करूनही आम्हाला आमचे हक्क व अधिकार माहीत नव्हते, पण या शिबिरामुळे ते समजले आणि आत्मविश्वास वाढला.”
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपाध्यक्ष सीताराम चव्हाण यांनी केले, तर आभार प्रदर्शन सेक्रेटरी एस. के. पळसे यांनी मानले.
शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व उपस्थित कामगार, संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे कौतुक करण्यात आले.

COMMENTS