Pune Illegal Construction | धनकवडी, कोंढवा परिसरात अनधिकृत बांधकामावर कारवाई!

Homeadministrative

Pune Illegal Construction | धनकवडी, कोंढवा परिसरात अनधिकृत बांधकामावर कारवाई!

Ganesh Kumar Mule Nov 06, 2025 7:47 PM

MLA Sunil Kamble | पुणे मनपामधील पाणीपुरवठा आणि STP प्रकल्पाची कामे पूर्ण करण्यास प्राधान्य  – उदय सामंत | आमदार सुनील कांबळे यांनी मांडली होती लक्षवेधी सूचना
PMC Ward 36 – Sahkarnagar Padmavati | प्रभाग क्रमांक ३६- सहकारनगर पद्मावती | प्रभागाची व्याप्ती आणि रचना सविस्तर जाणून घ्या 
Pune Property Tax | समाविष्ट गावांतील कर आकारणीचे विशेष ऑडिट करा | स्थायी समितीत प्रस्ताव मान्य 

Pune Illegal Construction | धनकवडी, कोंढवा परिसरात अनधिकृत बांधकामावर कारवाई!

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – पुणे महापालिका बांधकाम विभागाच्या वतीने धनकवडी आणि कोंढवा परिसरात अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली. धनकवडी च्या कारवाईत १३५०० चौरस फुट तर कोंढवा कारवाईत १८  हजार ५०० चौरस फुट बांधकाम वर कारवाई करण्यात आली. (PMC Building Devlopment Department)

 

धनकवडी नवीन हद्द सर्वे नंबर 22, सर्वे नंबर तीन, आंबेगाव खुर्द नवीन हद्द सर्वे नंबर 41 साई मंदिर परिसरा मागे 2 गल्ल्या येथील आर.आर.सी.सी/पक्क्या स्वरूपाचे अनधिकृत बांधकामांवर कार्यकारी अभियंता बांधकाम विकास विभाग झोन क्र. 02 विभागामार्फत कारवाई करण्यात आली. कारवाई च्या अनुषंगाने पोलिस कर्मचारी, महाराष्ट्र सुरक्षा बल च्या मदतीने कारवाई करण्यात आली. या कारवाई दरम्यान एकूण 13,500 चौरस फूट आर.सी.सी/पक्क्या स्वरूपाचे अनधिकृत बांधकाम क्षेत्र निष्कासित करण्यात आले आहे.
ही कारवाई महापालिकेचे अधीक्षक अभियंता व बांधकाम विभाग झोन क्र. 02 च्या कार्यकारी अभियंत्यांच्या मार्गदर्शनाखाली उप अभियंता, कनिष्ठ अभियंता यांचे उपस्थितीत करण्यात आली यात 1 जेसीबी, एक गॅस कटर, 7 अतिक्रमण कर्मचारी अशी यंत्रणा वापरण्यात आली.

कोंढवा खुर्द व कोंढवा बुद्रुक परिसरामध्ये अनाधिकृत बांधकाम कारवाई साठी नियुक्त केलेल्या विशेष पथकामार्फत आज रोजी कोंढवा खुर्द , भाग्योदय नगर S.no 52, मक्का मस्जिद जवळ एक B3+ 10 मजल्याच्या , इमारतीवर 15000 चौ.फुट आर सी सी बांधकाम तसेच कोंढवा बुद्रुक परिसरामधील स.नं. 5 (पार्ट ) लक्ष्मी नगर गल्ली नं. 1 येथे तळ मजला + 1 मजले (आर सी सी) व गल्ली नं. 5 येथे plinth वर कारवाई करण्यात आली आहे. एकूण सुमारे 18500 चौ.मी. कारवाई झाली. कारवाई साठी 6 बिगारी, 5 पोलीस, 1 jcb , 4 brekar, 2 गॅस cutter, 5 कनिष्ठ अभियंता, 2 उपअभियंता उपस्थित होते.

त्यामुळे  अनधिकृत बांधकाम हे कारवाई झाल्यामुळे धोकादायक झालेले आहे. त्याचा वापर करण्यात येऊ नये व सदर इमारतीत सदनिका विकत घेऊ नये.असे आवाहन पुणे महानगरपालिका तर्फे करण्यात आले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: