PMC Election Department | महापालिका निवडणूक कामासाठी नियुक्त कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना आता “सुट्टी” नाही!
| निवडणूक विभाग उपायुक्त यांचे आदेश
Pune PMC Election – (The Karbhari News Service) – पुणे महापालिका निवडणूक तोंडावर आली आहे. त्यासाठी महापालिकेतील काही कर्मचारी आणि अधिकारी यांची नियुक्ती निवडणूक कामासाठी केली आहे. मात्र काही लोक कामचुकारपणा करत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे आता निवडणूक होईपर्यंत रजा किंवा सुट्टी मिळणार नाही, असे आदेश निवडणूक विभागाचे उपायुक्त प्रसाद काटकर यांनी जारी केले आहेत. PMC Employees and Officers)
पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ चे कामकाजराज्य निवडणूक आयोग यांचे आदेश व निर्देशानुसार सुरु आहे. सद्यस्थितीत प्रभाग रचनेची कार्यवाही पूर्ण झालेली आहे. तसेच प्रारूप मतदार याद्यांचे कामकाज युद्ध पातळीवर सुरु असून निवडणूक विषयक इतर कामे ही अतित्वर्य व कालमर्यादेत पूर्ण करणे आवश्यक आहेत. त्यानुषंगाने असे निदर्शनास आले आहे की, निवडणूक कर्तव्यावर काम करत असताना अधिकारी / कर्मचारी रजेवर जात आहेत. त्यामुळे निवडणूक कामकाजात अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ चे संपूर्ण कामकाज पूर्ण होईपर्यंतचे कालावधीत निवडणूक कर्तव्यार्थ नियुक्त असणाऱ्या सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांची कोणत्याही प्रकारची रजा / सुट्टी ही निवडणूक कार्यालयाची पूर्वपरवानगीशिवाय मान्य करू नये. असे उपायुक्त यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे. अतिरिक्त महापालिका आयुक्त (वि) यांचे आदेशावरून हे आदेश जारी करण्यात आले आहेत. असे देखील आदेशात म्हटले आहे.

COMMENTS