PMC Deputy Commissioner | आशा राऊत, तुषार बाबर, संतोष टेंगले यांची पुणे महापालिकेत उपायुक्त पदावर प्रतिनियुक्तीने नियुक्ती | तर काही कार्यरत उपायुक्त यांची पुन्हा पुणे मनपात पदस्थापना

Homeadministrative

PMC Deputy Commissioner | आशा राऊत, तुषार बाबर, संतोष टेंगले यांची पुणे महापालिकेत उपायुक्त पदावर प्रतिनियुक्तीने नियुक्ती | तर काही कार्यरत उपायुक्त यांची पुन्हा पुणे मनपात पदस्थापना

Ganesh Kumar Mule Nov 04, 2025 9:05 PM

Sugar Production | साखर उत्पादनात महाराष्ट्र जगात तिसरा
Sushma Andhare news | व्यंगचित्रांतून बोचऱ्या गोष्टी मार्मिक पद्धतीने समाजापर्यंत पोहोचवता येतात |  शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे
NCP Youth | छत्रपतीं संदर्भातील वक्तव्यावरून युवक राष्ट्रवादीची कोथरूड मध्ये राज्यपालांच्या विरोधात बॅनरबाजी

PMC Deputy Commissioner | आशा राऊत, तुषार बाबर, संतोष टेंगले यांची पुणे महापालिकेत उपायुक्त पदावर प्रतिनियुक्तीने नियुक्ती | तर काही कार्यरत उपायुक्त यांची पुन्हा पुणे मनपात पदस्थापना

| तर काही अधिकाऱ्यांच्या बदल्या

Pune PMC News – (The Karbhari News Service) – राज्य सरकारच्या वतीने महाराष्ट्र शहरी प्रशासकीय सेवेतील मुख्याधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांना पदोन्नती देऊन त्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यानुसार आता आशा राऊत, तुषार बाबर, संतोष टेंगले यांची पुणे महापालिकेत उपायुक्त पदावर प्रतिनियुक्तीने नियुक्ती करण्यात आली आहे. तर काही प्रतिनियुक्तीवरील कार्यरत अधिकारी यांची पुन्हा पुणे महापालिकेत पदस्थापना करण्यात आली आहे. शासनाच्या उपसचिव प्रियांका कुलकर्णी छापवाले यांनी हे आदेश जारी केले आहेत. (Pune Municipal Corporation Officers)

आशा राऊत या पुणे महानगर परिवहन महामंडळ लि मध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर कार्यरत होत्या. संतोष टेंगले हे अहिल्यनगर महापालिकेत उपायुक्त पदावर काम पाहत होते. टेंगले आता उपायुक्त प्रसाद काटकर यांच्या सेवा सहायक आयुक्त पदावर काम करतील. तुषार बाबर हे रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर नगरपरिषद मध्ये मुख्याधिकारी म्हणून काम पाहत होते.

दरम्यान उपायुक्त सुनील बल्लाळ यांची बदली करून त्यांना काटोल नगरपरिषद येथे मुख्याधिकारी पदावर पदस्थापना देण्यात आली आहे.

तसेच सद्यस्थितीत पुणे महापालिकेत जे अधिकारी उपायुक्त म्हणून काम पाहत आहेत त्यांना पुन्हा पुणे महापालिकेत पदोन्नती देऊन त्यांची पदस्थापना उपायुक्त म्हणून करण्यात आली आहे. ते अधिकारी खालील प्रमाणे

१. अरविंद माळी, उपायुक्त
२. विजयकुमार थोरात, उपायुक्त
३. संतोष वारुळे, उपायुक्त
४. प्रशांत ठोंबरे, उपायुक्त

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: