PMC Deputy Commissioner | पुणे महापालिकेत आणखी दोन उपायुक्त प्रतीनियुक्तीने!
Pune PMC News – (The Karbhari News Service) – पुणे महापालिकेत आणखी दोन उपायुक्त प्रति नियुक्तीच्या माध्यमातून नेमण्यात आले आहेत. तर एका उपायुक्ताची बदली करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या वतीने या संदर्भात आदेश जारी करण्यात आले आहेत. (Pune Municipal Corporation – PMC)
राज्य सरकारच्या वतीने राज्यात मुख्याधिकारी गट अ संवर्गातील अधिकाऱ्यांच्या प्रती नियुक्तीने नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. या अधिकाऱ्यांची महापालिकेच्या आस्थापनेवरील पदावर महापालिकातील अधिकारी पदोन्नती ने उपलब्ध होईपर्यंत किंवा दोन वर्ष यापैकी अगोदर जे घडेल तोपर्यंत नियुक्ती करण्यात येणार आहे.
त्यानुसार नवी मुंबई मधे उपायुक्त पदी असणाऱ्या संतोष वारुळे यांना पुणे महानगरपालिका मध्ये उपायुक्त पदी नेमण्यात आले आहे. वारुळे यांनी या आधी देखील पुणे महानगरपालिका मध्ये काम केले आहे. तसेच अरविंद माळी यांची देखील पुणे महानगरपालिका उपायुक्त पदी नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान पुणे महापालिकेत उपायुक्त म्हणून काम पाहणाऱ्या संजय शिंदे यांची बदली नवी मुंबई येथे करण्यात आली आहे.
राज्य शासनाच्या उपसचिव प्रियांका कुलकर्णी छापवाले यांनी हे आदेश जारी केले आहेत.
COMMENTS