PMC Computers, Printer, Paper Purchase | अखेर महापालिकेच्या विविध विभागांना मिळणार संगणक, प्रिंटर, स्कॅनर! | बऱ्याच महिन्यापासून रखडली होती खरेदी 

HomeBreaking Newsपुणे

PMC Computers, Printer, Paper Purchase | अखेर महापालिकेच्या विविध विभागांना मिळणार संगणक, प्रिंटर, स्कॅनर! | बऱ्याच महिन्यापासून रखडली होती खरेदी 

गणेश मुळे Feb 04, 2024 10:57 AM

 Finally, Pune Municipal Corporation (PMC) got the opportunity to buy stationery!
PMC Central Store Department | गेल्या 6 महिन्यापासून अत्यावश्यक पेपर खरेदीच्या प्रस्तावाला मान्यताच मिळेना | महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच इतके दिवस रखडली खरेदी!
PMC Stationary Purchase | अखेर पुणे महापालिकेला स्टेशनरी साहित्य खरेदीला मिळाला मुहूर्त 

PMC Computers, Printer Purchase | अखेर महापालिकेच्या विविध विभागांना मिळणार संगणक, प्रिंटर, स्कॅनर! | बऱ्याच महिन्यापासून रखडली होती खरेदी

PMC Central Store Department | पुणे महापालिकेच्या अर्थसंकल्पात (Pune Municipal Corporation Budget) पुरेशी तरतूद असताना देखील क्षेत्रीय कार्यालये आणि विभागांना विविध प्रकारची सामग्री मिळण्यासाठी रखडावे लागले होते. अखेर मध्यवर्ती भांडार विभागाने (PMC Central Store Department) याबाबतची निविदा प्रक्रिया पूर्ण करून सामग्री खरेदीस सुरुवात केली आहे. त्यानुसार संगणक, स्कॅनर, प्रिंटर आणि आवश्यक पेपर मिळणार आहेत. 4 कोटींची ही खरेदी आहे. अशी माहिती मध्यवर्ती भांडार कार्यालयाकडून देण्यात आली. (Pune Municipal Corporation Central Store Department)
पुणे महानगरपालिका (PMC Pune) ही राज्यातीत दुसऱ्या क्रमांकाची महानगरपालिका असुन तिचे बजेट अंदाजे १० हजार कोटी जवळपास आहे. महानगरपालिकेत विविध खाती, क्षेत्रिय कार्यालये, असुन त्यांना दैनंदिन कामकाजा साठी मोठया प्रमाणावर साहित्य, वस्तु, मालाची  आवश्यकता असते. त्याची एकत्रितरित्या खरेदी करण्यासाठी  मध्यवर्ती भांडार विभागाची निर्मिती केली आहे. या विभागाकडुन खात्याच्या मागणी व आवश्यकतेनुसार वस्तु, साहित्य, माल खरेदी करून त्याचा पुरवठा  केला जातो. अशा खरेदीचे स्वतंत्र अधिकार इतर खात्याना नाहीत. असे असताना दैनंदिन वापरासाठी अत्यावश्यक असणारे पेपरची, टोनर सारख्या सामग्रीची खरेदी गेली काही महिन्यांपासुन भांडार विभागाकडून केली गेलेली नव्हती. याबाबत बरीच टीका झाल्यानंतर आता विभागाने सामग्री खरेदीस सुरुवात केली आहे. खासकरून हा बदल विभाग प्रमुख म्हणून गणेश सोनुने आल्यानंतर झाला आहे. या सामग्रीची रखडलेली निविदा प्रक्रिया सोनुने यांनीच पूर्ण केली आहे. (Pune Municipal Corporation (PMC)
मध्यवर्ती भांडार कार्यालयाच्या माहितीनुसार निविदा प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर 400 संगणक खरेदी बाबत ऑर्डर देण्यात आली आहे. नेट टेक सोल्युशन कंपनीकडून हे संगणक घेतले जाणार आहेत. यासाठी 3 कोटी 31 लाख इतका खर्च येणार आहे. 100 स्कॅनर घेतले जाणार आहेत. यासाठी 27 लाख 73 हजार इतका खर्च येणार आहे. 200 प्रिंटर चा खर्च 75 लाख इतका येणार आहे. अशी 4 कोटींहून अधिक खर्चाची सामग्री घेतली जाणार आहे. मागणीनुसार संबंधीत खात्याना सामग्री दिली जाणार आहे. 
: आवश्यक पेपर खरेदी सापडली होती वादात
पुणे महापालिकेत (Pune Municipal Corporation) सर्वच खाती आणि क्षेत्रीय कार्यालयांना पेपरची (Paper Purchase) आवश्यकता असते. प्रत्येक खात्याची ती मूलभूत गरज आहे. मध्यवर्ती भांडार विभाग (PMC Central Store Department) याची खरेदी करते. त्यासाठी चालू अर्थसंकल्पात (PMC Budget) 2 कोटींची तरतूद देखील केली आहे. मात्र महापालिकेत आर्थिक वर्ष सुरु झाल्यापासून भांडार विभागाकडून पेपर ची खरेदीच झाली नाही. कारण याबाबतच्या प्रस्तावाला आयुक्तांकडून अजून मंजूरीच मिळालेली नव्हती. पुणे महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच पेपर ची खरेदी इतके दिवस रखडली होती. यावरून महापालिकेत उलट सुलट चर्चाना उधाण आले होते. त्यानुसार पेपर खरेदी ची देखील टेंडर प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. यासाठी 70 लाख इतका खर्च येणार आहे. असे मध्यवर्ती भांडार विभागाकडून सांगण्यात आले.
—-