Pune Women Congress on Gas Cylinder Shortage | घरगुती गॅस ची दरवाढ रद्द करा – गॅस पुरवठा सुरळीत करा | पुणे शहर महिला काँग्रेसचे अनोखे आंदोलन

HomeBreaking News

Pune Women Congress on Gas Cylinder Shortage | घरगुती गॅस ची दरवाढ रद्द करा – गॅस पुरवठा सुरळीत करा | पुणे शहर महिला काँग्रेसचे अनोखे आंदोलन

Ganesh Kumar Mule Mar 14, 2026 7:10 PM

Deputy MOH PMC | उप आरोग्य अधिकारी पदासाठी अधिकारी पात्र असताना देखील पदोन्नती मिळेना! | माजी उपमहापौर डॉ सिद्धार्थ धेंडे यांची आरोग्य व्यवस्था बळकट करण्याची आयुक्तांकडे मागणी 
Video | Pune Truck Accident | पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात | Video पहा 
Municipal Elections | Ward Structure | पुण्यासह सर्वच महापालिकांची नव्याने होणार प्रभाग रचना | राज्य सरकारचे आदेश | महाविकास आघाडीला झटका

Pune Women Congress on Gas Cylinder Shortage | घरगुती गॅस ची दरवाढ रद्द करा – गॅस पुरवठा सुरळीत करा | पुणे शहर महिला काँग्रेसचे अनोखे आंदोलन

 

Pune Breaking News – (The Karbhari News Service) – घरगुती गॅस सिलेंडर ची दरवाढ रद्द करून, गॅस पुरवठा सुरळीत करा, अशा मागणीसाठी पुणे शहर महिला काँग्रेसच्या वतीने बालगंधर्व चौकात रस्त्यावर चूल पेटवून आज (शनिवारी) संध्याकाळी आंदोलन करण्यात आले. (Pune Women Congress Swati Shinde)

पुणे शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा स्वातीताई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. चौकात पारंपरिक पद्धतीने शेणाने सारवून शेणाच्या गोवऱ्यांचा ढीग रचून चूल मांडण्यात आली आणि त्यावर महिला कार्यकर्त्यांनी स्वयंपाक केला.

महागाईमुळे गरीब, मध्यमवर्गीय, कष्टकरी महिला वर्ग आधीच पिचला आहे. त्यातच अचानकपणे घरगुती गॅस सिलेंडर चे दर ६० रुपयांनी वाढविण्यात आले. सरकारचा हा निर्णय अनाकलनीय आहे. गॅस सिलेंडर अभावी हॉटेल्स बंद पडत आहेत. घरगुती गॅस सिलेंडर महाग झाला असून तो वेळेवर मिळणेही अवघड झाले आहे. सरकारच्या नियोजनशून्य कारभारामुळे हे घडत आहे., त्याचा आम्ही निषेध करत आहोत, असे स्वातीताई शिंदे यांनी आंदोलकांसमोर बोलताना सांगितले.

गॅस दरवाढीच्या विरोधात महिला कार्यकर्त्यांनी हातात फलक घेऊन आंंदोलन केले. ‘महागाईला आळा घाला, गॅस सिलेंडर स्वस्त करा’, ‘जनतेची लूट थांबवा, गॅस दर कमी करा’, गॅसच्या किंमती कमी करा, नाहीतर खुर्ची खाली करा’ अशा घोषणा फलकांवर लिहीलेल्या होत्या.

आंदोलनात स्वाती शिंदे यांच्या समवेत नगरसेविका अश्विनी लांडगे, अनिता मकवाना, रेखा जैन, ॲड.अंजली देसाई, ॲड.राजश्री दामले-चव्हाण, कल्पना शिंदे, ज्योती अडागळे, गितांजली प्रकाश, दिपाली पवार, मनोरमा चौधरी, वर्षा सपकाळ आदी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यां मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: