PMC Central Store Department | स्वातंत्र्यदिनाला शाळकरी मुले खाऊपासून राहणार वंचित! | टेंडर प्रक्रिया वेळेत पूर्ण न झाल्याचा फटका!

Homeadministrative

PMC Central Store Department | स्वातंत्र्यदिनाला शाळकरी मुले खाऊपासून राहणार वंचित! | टेंडर प्रक्रिया वेळेत पूर्ण न झाल्याचा फटका!

Ganesh Kumar Mule Aug 14, 2025 9:21 PM

79th Independence Day in PMC | पुणे महानगरपालिकेत भारताचा ७९ वा स्वातंत्र्य दिन समारंभ संपन्न
RSS | लाल किल्ल्यावरून आरएसएसचे कौतुक करण्याची आवश्यकता काय ?  भारतीय जनता पार्टीने उत्तर द्यावे  | कॉंग्रेस ची मागणी 
Pune PMC News | खाऊ पासून मुले वंचित राहणर नाहीत  | उपायुक्त किशोरी शिंदे यांची माहिती 

PMC Central Store Department | स्वातंत्र्यदिनाला शाळकरी मुले खाऊपासून राहणार वंचित! | टेंडर प्रक्रिया वेळेत पूर्ण न झाल्याचा फटका!

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – पुणे महापालिका प्राथमिक शाळेतील १ ली ते आठवीच्या मुलांना स्वातंत्र्य दिन समारंभाला खाऊ स्वरुपात बिस्किटे दिली जातात. मात्र यंदा हा खाऊ स्वातंत्र्यदिनाला न मिळता स्वातंत्र्य दिन झाल्यावर दोन तीन दिवसांनी मिळण्याची शक्यता आहे. कारण बिस्किट खरेदीची टेंडर प्रक्रिया अजून पूर्ण झालेली नाही. मध्यवर्ती भांडार विभागाची उदासीनता याला कारणीभूत मानली जात आहे. (PMC Independence Day)

१५ ऑगस्ट तथा स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी परंपरेप्रमाणे महापालिकेच्या प्राथमिक शाळेतील मुलांना खाऊ वाटप केले जाते. बिस्किटांची खरेदी मध्यवर्ती भांडार विभागाकडून केली जाते. शाळेय विभागाकडून यांची मागणी केली जाते. त्यानुसार प्रक्रिया केली जाते. दरवर्षी ७ दिवस अगोदर ही प्रक्रिया पूर्ण केली जाऊन माल आणला जातो. मात्र यंदा ही प्रक्रिया अजून पूर्ण झालेली नाही.

शिक्षण विभागाकडून जून महिन्यात याची मागणी करण्यात आली होती. मात्र भांडार विभागाने दुर्लभ केल्याने ही टेंडर प्रक्रिया वेळेत पूर्ण होऊ शकली नाही. २८ लाखांचे बिस्कीट खरेदीचे हे टेंडर काल उघडण्यात आले. असे असले तरी प्रक्रिया पूर्ण करणे आणि माल मागवणे यात वेळ जाणार आहे. त्यामुळे स्वातंत्र्य दिनाला मुलांना बिस्कीट मिळणे कठीण आहे. स्वातंत्र्य दिन झाल्यानंतर हा खाऊ मुलांना मिळू शकतो.

दरम्यान या बाबत मध्यवर्ती भांडार विभागाच्या विभाग प्रमुख आणि अतिरिक्त आयुक्त यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: