PMC CHS | सैनिक प्रवर्गातून नेमणूक झालेल्या कर्मचाऱ्यांना CHS योजनेचे सभासद करता येणार नाही  | महापालिका अतिरिक्त आयुक्तांचे आदेश 

Homeadministrative

PMC CHS | सैनिक प्रवर्गातून नेमणूक झालेल्या कर्मचाऱ्यांना CHS योजनेचे सभासद करता येणार नाही | महापालिका अतिरिक्त आयुक्तांचे आदेश 

Ganesh Kumar Mule Sep 17, 2024 4:58 PM

Spit Bin | PMPML Bus Stop | पीएमपी बसस्थानकावर ‘स्पिट बिन’ बसवणार  | परिसर स्वच्छ ठेवणार 
Rajiv Gandhi Zoological Park | Katraj Zoo | पुणे महापालिकेकडून  लहानग्यांना ‘ख्रिसमस गिफ्ट’ | उद्यापासून पुढील 8 दिवस कात्रज झू मोफत पाहण्याची संधी! 
Circular | Time Bound Promotion | कालबद्ध पदोन्नती बाबतचे परिपत्रक महापालिका प्रशासनाकडून जारी |लाभ देण्यासाठी पदोन्नती समिती पुढे ठेवावी लागणार प्रकरणे

PMC CHS | सैनिक प्रवर्गातून नेमणूक झालेल्या कर्मचाऱ्यांना CHS योजनेचे सभासद करता येणार नाही

| महापालिका अतिरिक्त आयुक्तांचे आदेश

 

PMC CHS Scheme – (The Karbhari News Service) – पुणे महापालिकेत (Pune Municipal Corporation (PMC) माजी सैनिक प्रवर्गातून नेमणूक झालेल्या सेवकांना केंद्र शासनाच्या सी.जी. एच. एस. (CGHS) योजनेतून चांगल्या दर्जाची सेवा मिळते. तसेच या सेवकांकडे सी.जी.एच.एस. चे सभासदत्व असल्याने अशा माजी सैनिक प्रवर्गातून नेमणूक झालेल्या सेवकांना महापालिकेच्या अंशदायी वैद्यकीय सहाय्य योजनेचे (CHS) सभासदत्व देणेत येऊ नये. असे आदेश महापालिका अतिरिक्त आयुक्तांनी दिले आहेत. (Pune PMC News)

पुणे मनपा आस्थापनेवर माजी सैनिक प्रवर्गातील उमेदवारांना शेडयुलमान्य जागेवर नियुक्ती मिळाली आहे.  हे सेवक मनपा आस्थापनेवरील विविध खात्यांमध्ये कार्यरत आहेत. अशा सेवकांकडून आरोग्यविभागाकडे अंशदायी वैद्यकीय सहाय्य योजनेचे सभासदत्व मिळणेबाबत विनंती अर्ज दाखल होत असतात. अंशदायी वैद्यकीय सहाय्य योजनेच्या प्रचलित नियमावलीमध्ये माजी सैनिक प्रवर्गातून नेमणूक झालेल्या कर्मचा-यांना अंशदायी वैद्यकीय सहाय्य योजनेचे सभासदत्व देणेबाबत पुरेशी स्पष्टता दिसून येत नसल्याने माजी सैनिक प्रवर्गातून गुणे मनपाकडे शेडयुलमान्य जागेवर नेमणूक झालेल्या सेवकांना अंशदायी वैद्यकीय सहाय्य योजनेचे सभासदत्व देणेबाबतचा विषय अंशदायी वैद्यकीय सहाय्य योजनेच्या बैठकीत चर्चेला ठेवण्यात आला होता.

अंशदायी वैद्यकीय सहाय्य योजना समितीच्या ८ जुलै रोजी झालेल्या बैठकीत याबाबत निर्णय झाला आहे.

त्यानुसार माजी सैनिक प्रवर्गातून नेमणूक झालेल्या सेवकांना  केंद्र शासनाच्या सी.जी. एच. एस. योजनेतून चांगल्या दर्जाची सेवा मिळत असल्याने व सदर सेवकांकडे सी.जी.एच.एस. चे सभासदत्व असल्याने अशा माजी सैनिक प्रवर्गातून नेमणूक झालेल्या सेवकांना अंशदायी वैद्यकीय सहाय्य योजनेचे सभासदत्व देणेत येऊ नये. तसेच त्यांचे मासिक वेतनातून सी.एच.एस. वर्गणी कपात करणेत येऊ नये असे आदेश मा. अतिरिक्त महापालिका आयुक्त (ज) यांनी बैठकीत दिले आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0