M J Pradip Chandren IAS | पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी एम जे प्रदीप चंद्रन!
| राज्य सरकार कडून आदेश जारी
PMC Additional Commissioner – (The Karbhari News Service) – पुणे महापालिकेला (Pune Municipal Corporation – PMC) बऱ्याच महिन्यांच्या प्रतीक्षे नंतर अखेर अतिरिक्त आयुक्त मिळाले आहेत. उद्योग संचालनालय चे अतिरिक्त विकास आयुक्त एम जे प्रदीप चंद्रन (M J Pradip Chandren IAS) यांना सरकारने महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदी नियुक्त केले आहे. (Pune PMC News)
पुणे महापालिकेत अतिरिक्त आयुक्त पदाची तीन पदे आहेत. सद्यस्थितीत फक्त पृथ्वीराज बी पी हे एकाच अतिरिक्त आयुक्त आहेत. त्यांच्याकडे सर्व कारभार देण्यात आला आहे. अजून दोन पदे रिक्त होती. यातील एक पद हे पुणे महापालिकेतील अधिकाऱ्यांसाठी राखीव आहे. मात्र ते भरले जात नाही. दरम्यान आता अजून एक अतिरिक्त आयुक्त पुणे महापालिकेला मिळाला आहे.
उद्योग संचालनालय चे अतिरिक्त विकास आयुक्त एम जे प्रदीप चंद्रन यांना सरकारने महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदी नियुक्त केले आहे. राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव व्ही राधा यांनी याबाबत आदेश जारी केले आहेत.
COMMENTS