Madhuri Misal on PMC Projects | शहराच्या वाढत्या गरजांना अनुसरून प्रकल्पांची गती वाढवा | राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांचे आदेश 

Homeadministrative

Madhuri Misal on PMC Projects | शहराच्या वाढत्या गरजांना अनुसरून प्रकल्पांची गती वाढवा | राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांचे आदेश 

Ganesh Kumar Mule Apr 27, 2026 7:41 PM

Safai Karmchari | पुणे महानगरपालिकेने ‘वाल्मिकी भवन’ उभारण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी – भगवत प्रसाद मकवाना | सफाई कामगारांचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावा
PMC Employees Transfer | मिळकत कर, भवन रचना विभागातील बदल्यात आर्थिक देवाणघेवाण  | कॉंग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांचा आंदोलनाचा इशारा 
Environment Conservation | अस्थिविसर्जन नदीत न करता वृक्षारोपण करण्याचा विधायक उपक्रम | पर्यावरण संवर्धनाचा दिला गेला संदेश

Madhuri Misal on PMC Projects | शहराच्या वाढत्या गरजांना अनुसरून प्रकल्पांची गती वाढवा | राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांचे आदेश

|  राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली महापालिका विकास प्रकल्पांचा सखोल आढावा

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – महाराष्ट्र राज्याच्या नगर विकास, परिवहन, सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण, अल्पसंख्यांक विकास  राज्यमंत्री श्रीमती माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली आज  पुणे महानगरपालिकेमध्ये विविध विकास प्रकल्पांबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत शहराच्या सर्वांगीण प्रगतीसंदर्भात सखोल चर्चा करण्यात आली. (Pune Municipal Corporation – PMC)

आढावा बैठकीमध्ये मुळा-मुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्प (RFD), अमृत योजना, समाविष्ट ११ गावांचा विकास आराखडा (DP), मलनिःसारण प्रकल्प, पाणी प्रक्रिया प्रकल्प, रस्ते विकास प्रकल्प, प्रधानमंत्री आवास योजना व श्रम साफल्य योजना, पाणीपुरवठा योजना, पावसाळ्यापूर्वीची रस्त्यांची कामे व नाला सफाई, आपत्ती व्यवस्थापन, वाहतूक आराखडा, घनकचरा व्यवस्थापन तसेच नव्याने समाविष्ट २३ गावांमधील नागरी सुविधा (रस्ते, पाणी, सांडपाणी) आणि शाळा व रुग्णालयांचे आधुनिकीकरण व दर्जा सुधारणा या महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

यावेळी शहराच्या वाढत्या गरजांना अनुसरून प्रकल्पांची गती वाढवणे, नागरिकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देणे आणि आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती तयारी पूर्ण करणे यावर विशेष भर देण्यात आला. पुणेकरांना अधिक सक्षम पायाभूत सुविधा, सुयोग्य नियोजन, स्वच्छ व सुंदर शहर तसेच आधुनिक नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सुरू असलेल्या आणि आगामी विविध प्रकल्पांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी विकासकामांना अधिक वेग, गुणवत्ता आणि परिणामकारकता देण्यावर विशेष भर देण्यात आला.

बैठकीसाठी महापौर मंजुषा नागपुरे, उपमहापौर परशुराम वाडेकर,  स्थायी समिती अध्यक्ष  श्रीनाथ भिमाले, विरोधी पक्षनेते  निलेश निकम, रिपब्लिकन पार्टी आठवले गटाच्या  पक्षनेत्या हिमाली कांबळे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे  पक्षनेते  सोपान चव्हाण, शिवसेना उ.बा.ठा.चे पक्षनेते    नितीन गावडे, महापालिका आयुक्त  नवल किशोर राम, अतिरिक्त महापालिका आयुक्त (जनरल)  पवनीत कौर,  अतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष)  ओमप्रकाश दिवटे, उपायुक्त, खातेप्रमुख, तसेच संबंधित महापालिका अधिकारी व कर्मचारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: