Consultant in PMC | महापालिकेत तज्ञ इंजिनियर असताना सल्लागार का नेमला जातो? | माजी नगरसेवकांचा महापालिका आयुक्त यांना सवाल

Homeadministrative

Consultant in PMC | महापालिकेत तज्ञ इंजिनियर असताना सल्लागार का नेमला जातो? | माजी नगरसेवकांचा महापालिका आयुक्त यांना सवाल

Ganesh Kumar Mule Apr 27, 2026 7:55 PM

Pune PMC News | समान पाणी योजनेतील पाण्याच्या टाक्यांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार लोकार्पण | महापौर आणि सभागृह नेते यांनी घेतला आढावा 
Mahavikas Aghadi With MNS | महापालिका आयुक्त बंगला प्रकरणा वरून मनसे च्या मदतीला धावली महाविकास आघाडी! 
Naval Kishore Ram IAS | आपत्कालीन परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात येईपर्यंत मुख्यालय न सोडण्याचे आयुक्तांचे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना आदेश 

Consultant in PMC | महापालिकेत तज्ञ इंजिनियर असताना सल्लागार का नेमला जातो? | माजी नगरसेवकांचा महापालिका आयुक्त यांना सवाल

 

PMC Pune News – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिकेमध्ये विविध प्रकल्पीय विकास कामे केली जातात. यासाठी खाजगी सल्लागार नेमले जातात. महापालिकेत स्वतःचे तज्ञ अधिकारी असताना महापालिका पैशाची उधळपट्टी का करते? असा सवाल माजी नगरसेवक उज्ज्वल केसकर, प्रशांत बधे आणि सुहास कुलकर्णी यांनी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांना केला आहे. (Pune PMC News)

माजी नगरसेवकांनी म्हटले आहे की, महापालिकेत सध्या सल्लागारांचा सुळसुळाट झाला आहे. प्रत्येक कामासाठी सल्लागार नेमावा लागतो ही शोकांतिका आहे. सल्लागार संस्थेकडे तज्ञ नसतात. ते त्यांचे फक्त प्रोफाईल दाखल करतात. त्यामुळे त्यांच्या कडे पे रोल वरील व्यक्तींची मागणी महापालिकेने करावी.

माजी नगरसेवकांनी पुढे म्हटले आहे की, पुणे महानगरपालिकेमध्ये अनेक तज्ञ इंजिनियर असताना आपण सल्लागार का नेमतो हा प्रश्न सर्वसामान्य पुणेकरांच्या मनामध्ये आहे. महानगरपालिकेचे अधिकारी सक्षम असताना सल्लागार नेमून आपण जबाबदारी ढकलतो आहे. या पुढच्या काळामध्ये सल्लागारांचा सल्ला न घेता अधिकाऱ्यांना काम करण्यासाठी उद्युक्त करावे आणि त्यांच्यावर विश्वास टाकावा त्यामुळे खो-खोचा खेळ संपेल. अशी मागणी या नगरसेवकांनी केली आहे.
——

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: