PMC Standing Committee  | आकांक्षा फाउंडेशनचा 101 कोटींचा प्रस्ताव थांबला |  शिक्षण समितीमार्फतच पुढे जाणार

Homeadministrative

PMC Standing Committee  | आकांक्षा फाउंडेशनचा 101 कोटींचा प्रस्ताव थांबला |  शिक्षण समितीमार्फतच पुढे जाणार

Ganesh Kumar Mule Jun 11, 2026 9:37 PM

Supreme court order about municipal elections | ९ कोटी नागरीकांसाठी योग्य तो निर्णय होईल | प्रशांत जगताप
Home Loan for PMC Employees | पुणे मनपा अधिकारी व कर्मचारी पुणे जिल्ह्यात कुठेही घेऊ शकतील घर किंवा जागा | गृहकर्जाच्या अटीत सुधारणा
Pune Ganeshotsav 2025 | गणेशात्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेश दर्शन सहलीचे आयोजन!

PMC Standing Committee  | आकांक्षा फाउंडेशनचा 101 कोटींचा प्रस्ताव थांबला |  शिक्षण समितीमार्फतच पुढे जाणार

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) –  पुणे महापालिकेच्या 5 इंग्रजी माध्यम शाळा पुढील 9 वर्षे PPP तत्त्वावर चालवण्याच्या आकांक्षा फाउंडेशनच्या प्रस्तावावर स्थायी समितीने ब्रेक लावला आहे. थेट स्थायी समितीकडे आलेला प्रस्ताव आता फेरविचार करून आधी शिक्षण समितीकडे जाणार आहे. (PMC Eduction Committee)

स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी सांगितले की, प्रति विद्यार्थी 25 हजार रुपये प्रमाणे सुमारे 4500 विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी 11.25 कोटी आणि 9 वर्षांत एकूण 101.25 कोटी रुपये खर्चाचा हा प्रस्ताव आहे. इतका मोठा आर्थिक भार महापालिकेच्या तिजोरीवर पडणार असल्याने त्यावर फेरविचार होणं गरजेचं आहे.

सध्या सोमवार पेठ, भवानी पेठ, बोपोडी, येरवडा आणि कोरेगाव पार्क येथील या 5 शाळा आकांक्षा फाउंडेशनमार्फत चालवल्या जातात. शाळेच्या इमारती, वीजबिल, देखभाल, गणवेश, DBT, मध्यान्ह भोजन याचा खर्च आधीच मनपा उचलत आहे.

यावर फेरविचार करून प्रस्ताव आधी शिक्षण समितीसमोर मांडून नंतरच स्थायी समितीकडे येणार आहे. त्यामुळे  शिक्षण समितीच्या शिफारशीनंतरच पुढील निर्णय घेतला जाईल, असं भिमाले यांनी स्पष्ट केलं.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: