MNS | PMC Election | 1 हजार लोकांमागे १ राजदूत | पुणे महापालिका निवडणुकीसाठी मनसे ची जोरदार तयारी 

HomeपुणेBreaking News

MNS | PMC Election | 1 हजार लोकांमागे १ राजदूत | पुणे महापालिका निवडणुकीसाठी मनसे ची जोरदार तयारी 

Ganesh Kumar Mule Nov 02, 2022 5:29 AM

PMRDA Calendar | दिनदर्शिकेच्या माध्यमातून पीएमआरडीए पोहोचणार गावागावात
ChatBot | महापालिकेशी संबंधित माहिती सहजपणे नागरिकांना उपलब्ध करून देणेकरीता महापालिका ChatBot प्रणाली वापरणार 
PMC Pune Theatre | शहरातील नाट्यगृहांचे नूतनीकरण करण्यासाठी पुणे महापालिका नागरिकांकडून सूचना मागवणार

1 हजार लोकांमागे १ राजदूत | पुणे महापालिका निवडणुकीसाठी मनसे ची जोरदार तयारी

| 3500 राजदूत नेमले जाणार

पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी मनसे  सज्ज झाली आहे. पुण्यासाठी मनसेकडून रणनिती आखली आहे. प्रत्येक मतदारापर्यंत पोहचण्यासाठी राजदूत नेमण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार 3500 राजदूत नेमले जाणार आहेत.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकतीच मुंबईत पदाधिकारी आणि पक्षाच्या सचिवांची बैठक पार पडली आहे. पुण्यात मनसे 3500 राजदूत नेमणार आहे. पुण्यातील प्रत्येक सर्वसामान्य नागरीक आणि मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी मनसेने राजदूत ही नवी संकल्पना आणली आहे. या उपक्रमातून मनसे पुण्याच्या प्रत्येक घरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात लवकरच राजदूतांची नेमणूक करण्यात येईल. त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा पुण्यात मेळावा होईल. या मेळाव्यानंतर लगेच आगामी पुण्याच्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंची भव्य सभा देखील घेतली जाण्याची शक्यता आहे.

पक्षाचे पुण्याचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांना राजदूत नेमण्याबाबत सूचना केल्या आहेत. मनसेच्या संघटनात्मक पातळीवरच्या विभागनिहाय नेमणुका करण्यात येणार आहेत. दरहजारी मतदारांच्या मागे एक राजदूत नेमण्यासाठी आवश्‍यक तयारी करण्यात येत असल्याचे शहराध्यक्ष बाबर यांनी सांगितले.

राजदूताची नियुक्ती झाल्यानंतर त्याने संबंधित भागात पक्षाची ध्येय धोरणे यांचा प्रचार आणि प्रसार करायचा आहे. शिवाय या अगोदर तिथे पक्षाच्या नगरसेवकाने केलेली कामे, लोकांपर्यंत पोचवायची आहेत.

साईनाथ बाबर, शहर अध्यक्ष, मनसे, पुणे.