Khadakwasla Dam Chain | खडकवासला  धरण साखळीत १६ TMC पाणी | चार धरणे  ५५ टक्के भरली  | खडकवासला धरणातून आतापर्यंत १.५१ टीएमसी विसर्ग 

Homeadministrative

Khadakwasla Dam Chain | खडकवासला  धरण साखळीत १६ TMC पाणी | चार धरणे  ५५ टक्के भरली  | खडकवासला धरणातून आतापर्यंत १.५१ टीएमसी विसर्ग 

Ganesh Kumar Mule Jul 09, 2026 8:03 AM

Khadakwasla Water Discharge | खडकवासला धरणातून आज 5 वाजता 1 हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात येणार
Khadakwasla Dam Chain | Pune Rain Update | खडकवासला प्रकल्पातील 4 धरणांत मागील 2 दिवसांत वाढले 1 टीएमसी पाणी
Pune Water Supply News | पुण्यातील पाणीटंचाई मनुष्यनिर्मित | कालवा समितीच्या बैठकींचे वृत्तांत जाहीर करण्याची मागणी

Khadakwasla Dam Chain | खडकवासला  धरण साखळीत १६ TMC पाणी | चार धरणे  ५५ टक्के भरली  | खडकवासला धरणातून आतापर्यंत १.५१ टीएमसी विसर्ग

 

Khadakwasla Dam Rain  – (The Karbhari News Service) – खडकवासला धरण परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे पुण्याला पाणीपुरवठा करणारी खडकवासला धरण साखळी वेगाने भरत आहे. आज सकाळी ६ वाजेपर्यंत चारही धरणांमधील एकूण पाणीसाठा १६.०० टीएमसी म्हणजेच ५४.८९ टक्के झाला आहे. काल याच वेळी हा साठा १३.९७ टीएमसी होता. म्हणजेच २४ तासात साखळीमध्ये २.०३ टीएमसीने वाढ झाली आहे. (Pune Rain News)

धरणनिहाय आकडेवारी – ९ जुलै, सकाळी ६ वाजता

1) खडकवासला धरण | पाणीसाठा: १.९६ टीएमसी – ९.१६ टक्के
सध्या नदीपात्रातील विसर्ग बंद
आतापर्यंत सांडव्यातून सोडलेला एकूण विसर्ग: १.५१ टीएमसी

2) पानशेत धरण | पाणीसाठा: ६.०१ टीएमसी – ५६.४ टक्के

3) वरसगाव धरण | पाणीसाठा: ६.७० टीएमसी – ५२.३० टक्के

4) टेमघर धरण  | पाणीसाठा: १.३ टीएमसी – ३५.७८ टक्के

एकूण पाणीसाठा: १६.० टीएमसी – ५४.८९ टक्के
गेल्या वर्षी याच दिवशी साठा: १९.८१ टीएमसी – ६७.९७ टक्के होता.

खडकवासला धरण आता पूर्ण क्षमतेने भरलेले आहे. धरणातून आतापर्यंत १.५१ टीएमसी पाणी सांडव्यातून नदीपात्रात सोडण्यात आले आहे. सध्या नदीपात्रातील विसर्ग बंद असून कालवा आणि PMC ला पाणीपुरवठा सुरू आहे.

पानशेत आणि वरसगाव धरणही अर्ध्याहून अधिक भरली आहेत. टेमघर धरणातही पाण्याची आवक चांगली आहे. जलसंपदा विभागाकडून धरणातील पाणीपातळी आणि आवक यावर दर तासाला लक्ष ठेवण्यात येत आहे. पुढील २४ तासात पावसाचा जोर कायम राहिल्यास विसर्गात वाढ होण्याची शक्यता प्रशासनाने वर्तवली आहे.

 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: