Hadapsar Water Project | हडपसर परिसरातील समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत प्रलंबित सहा पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करा | काँग्रेसची मागणी
Pune Congress – (The Karbhari News Service) – काँग्रेस नेते माजी आमदार मोहन जोशी यांचे नेतृत्वाखाली हडपसर पाणीपुरवठा अर्धवट अवस्थेत असणाऱ्या योजने संदर्भात काँग्रेस शिष्ट मंडळाने महापालिका आयुक्तांची भेट घेतली. (Pune Municipal Corporation Servants- PMC)
यावेळी प्रशांत सुरसे, पल्लवी सुरसे, नंदकुमार आजोतीकर, सचिन मकर, गणेश जगताप, ऋषभ रणदिवे, संदेश भडकुंबे आदी लोक उपस्थित होते.
सुरसे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदना नुसार हडपसर गावठाण, गाडीतळ हा परिसर सुमारे ६० वर्षापासून पुणे महानगरपालिकेत आहे तर सातववाडी, गोंधळेनगर, १५ नंबर,लक्ष्मी कॉलनी, आकाशवाणी, विठ्ठल नगर, ससाणे नगर, काळे बोराटे नगर, हा परिसर सन १९९७ सालापासून पुणे महापालिका हद्दीत समाविष्ट झालेला आहे. तरीसुद्धा या सर्व परिसरात आज तगायत कमी दाबाने अनियमित पाणीपुरवठा रात्री-अपरात्री पहाटे ४ वाजता असा कधीही तर काही भागाला फक्त एकच तास पाणी पुरवठा होत आहे.
कर रूपाने करोडो रुपये या परिसरातून महसूल वसूल करून सुद्धा गेले २७ वर्षे फक्त एक तास पाणी मिळत असल्याने नागरिक विशेषता माता भगिनी संतप्त झालेले आहेत.
माहिती अधिकारातून प्राप्त झालेल्या माहितीनुसार पुणे महानगरपालिकेच्या समान पाणीपुरवठा योजना अंतर्गत हडपसरच्या विविध भागात सन २०१६ सन २०१७ व सन २०१८ पासून एकुण ६ पाणीपुरवठा योजनेची कामे सुरू करण्यात आली आहेत.
परंतु अत्यावश्यक असणाऱ्या या पाणीपुरवठा योजना निधी अभावी अथवा पाठ पुराव्या अभावी तसेच प्रशासकीय विविध कारणांमुळे अपूर्ण – अर्धवट अवस्थेत आहेत. त्यामुळे या योजना तात्काळ पूर्ण कराव्यात. अशी मागणी सुरसे यांनी केली आहे.
COMMENTS