Pune Property tax | डिसेंबर महिन्यात मिळकत कर विभागाने १०१ मिळकती केल्या सील | तर मिळवले ५२ कोटींचे उत्पन्न!
PMC Property Tax Department – (The Karbhari News Service) – महापालिकेच्या मिळकत कर विभागाने (Pune Municipal Corporation Property Tax Department) डिसेंबर महिन्यात १०१ मिळकती सील केल्या आहेत. तर आतापर्यंत ५२ कोटी रुपये उत्पन्न मिळाले आहे. तसेच या आर्थिक वर्षात १८६५ कोटी महसूल महापालिकेच्या तिजोरीत जमा झाला आहे. अशी माहिती उपायुक्त माधव जगताप (Madhav Jagtap PMC) यांनी दिली. (Pune PMC News)
कर आकारणी व कर संकलन खात्याने सन २०२४-२५ चे उद्दिष्ट पूर्ततेच्या अनुषंगाने थकबाकी वसुली मध्ये मोठ्या प्रमाणात लक्ष्य केंद्रित केलेले आहे. त्या अनुषंगाने २ डिसेंबर पासून मिळकत कर वसुलीसाठी बँड पथकाचा समावेश असलेले स्वतंत्र वसुली पथके तयार करण्यात आलेली आहेत. या पथकामार्फत १५ क्षेत्रिय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील थकबाकी असलेल्या मिळकतीवर थकबाकी वसुलीची कारवाई हाती घेण्यात आलेली आहे.
त्यानुसार दिनांक २ डिसेंबर ते २६ डिसेंबर या पंचवीस दिवसांच्या काळामध्ये बँड पथकाद्वारे व मध्यवर्ती पथकाद्वारे ४२९ इतक्या मिळकतींना भेट देण्यात येवून, रक्कम रु. ५२,२४,६३,६१४ ( बावन्न कोटी चोवीस लाख त्रेसष्ठ हजार सहाशे चौदा फक्त) इतक्या रकमेचा कर वसुल करण्यात आलेला आहे. तसेच १०९ इतक्या मिळकती सिलबंद करण्यात आलेल्या आहेत.
पुणे महानगरपालिका कार्यक्षेत्रात सुमारे १४ लाख ८० हजार मिळकती असून, त्यापैकी सुमारे ८,९०,६२७ मिळकत धारकांनी त्यांचा मिळकत कर रक्कम रु. १८६५.२४ कोटी इतका जमा केलेला आहे. उर्वरित मिळकत कर थकबाकी धारकांकडे या पुढील कालावधी मध्ये मोठ्या प्रमाणात थकबाकी वसुली करण्यासाठी वरील पथकांमार्फत मिळकत कर वसुलीचे काम करण्यात येणार आहे. तरी ज्या मिळकत धारकांनी अद्यापही कराचा भरणा केलेला नाही, त्यांनी लवकरात लवकर मिळकत कर भरावा, अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. असा इशारा उपायुक्त जगताप यांनी दिला आहे.
COMMENTS