GB Syndrome in Pune – आजपर्यंत ७२१५ घरांचे सर्वेक्षण | किरकटवाडी, धायरी परिसरातील पाणी पिण्यास योग्य असल्याचा महापालिकेचा दावा
GBS Pune News – (The Karbhari News Service) – GBS चा फैलाव झाल्यानंतर महापालिकेने (PMC) किरकटवाडी टाकी, नांदोशी टाकी, धायरेश्वर टाकी, समर्थ मंदिर टाकी व सणसवाडी टाकी या ठिकाणच्या प्रत्येकी १०० मिलिलिटर पाण्याची तपासणी करून घेतली. राज्याच्या सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेतून ही तपासणी करून घेण्यात आली. यात कॉलिफॉर्म, थर्मोटोलर अँट बॅक्टेरिया व ई कोलाय या तिन्ही जीवाणूंचे प्रमाण शून्य असल्याचे स्पष्ट झाले आहे. या सर्व ठिकाणचे पाणी पिण्यास योग्य असल्याचेही अहवालात म्हटले आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी. (Prithviraj B P IAS) यांनी दिली. (Pune GBS News)
Guillain Barre Syndrome रुग्णांची संख्या पुण्यात ७३ वर पोचली आहे. यातील १४ रुग्ण हे वेंटीलेटर वर आहेत. यापैकी ४४ रुग्ण पुणे ग्रामीण, ११ रुग्ण पुणे मनपा, १५ रुग्ण पिंपरी चिंचवड मनपा व ३ रुग्ण इतर जिल्हयातील आहेत. त्यापैकी ४७ पुरुष व २६ महिला आहेत.
दरम्यान GBS च्या अनुषंगाने घरोघरी सर्वेक्षण केले जात आहे. त्यानुसार आजपर्यंत पुणे महापालिकेने १९४३ घरे, पिंपरी चिंचवड मनपा ने १७५० घरे आणि पुणे ग्रामीण ३५२२ घरे अशा एकूण ७२१५ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. अशी माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.
COMMENTS