GBS Autoimmune Disease | GBS ला अजिबात घाबरू नका | फक्त डॉ संजीव वावरे काय सांगतात ते समजून घ्या!
Guillain barre syndrome autoimmune – (The Karbhari News Service) – गेल्या काही दिवसापासून पुणेकर हे GBS च्या प्रादुर्भावामुळे त्रस्त आहेत. असा एखादा आजार आला कि, लोकांना घाबरवून सोडण्यात प्रसारमाध्यमे (Media) खूप जोरकसपणे काम करतात. साहजिकच गर्दीचा विश्वास बसतो आणि लोक जास्तच घाबरून जातात. महापालिका आरोग्य विभाग आणि राज्याचा सार्वजनिक आरोग्य विभाग देखील लोकामंधील या बाबतचे गैरसमज दूर करण्यात अयशस्वी ठरले आहेत. मात्र याबाबत महापालिका आरोग्य विभागाचे सहायक आरोग्य अधिकार डॉ संजीव वावरे (Dr Sanjeev Wavre PMC) यांनी मात्र या आजाराबाबत खूप सखोल विश्लेषण केले आहे. शिवाय वैज्ञानिक माहिती दिली आहे. जेणेकरून लोकांचे गैरसमज दूर होतील आणि लोक घाबरून जाणार नाहीत. तर डॉ वावरे काय म्हणतात ते आपण समजून घेऊया. (GBS Autoimmune Disorder Guillain-Barré Syndrome (GBS) is an acute autoimmune disorder affecting the peripheral nervous system.)
डॉ वावरे यांच्यासोबत आमच्या प्रतिनिधी ने विशेष संवाद साधला आहे.
डॉ वावरे म्हणाले कि, लोकांना असे वाटते कि, हा आजार असा अचानक कसा उद्भवला. मात्र हे तसे नाही. हा आजार खूप वर्षापासून पुण्यात आहे. फक्त पुण्यातच नाही तर महाराष्ट्र राज्य, आपला देश आणि जगभरात आहे. हा विषाणू (Virus) नाही किंवा जीवाणू (“Bacteria) देखील नाही. हा एक सिंड्रोम आहे. हा सांसर्गिक आजार नाही किंवा जलजन्य देखील नाही. हा एक स्वयंप्रतिकार रोग (GBS Autoimmune Disease) आहे.
आधी आपण स्वयंप्रतिकार रोग (Autoimmune Disease) म्हणजे काय ते समजून घेऊया. स्वयंप्रतिकार रोग हा अशा परिस्थितींचा एक समूह आहे जिथे शरीरातील निरोगी पेशींवर चुकून रोगप्रतिकारक शक्तीचा हल्ला होतो. 80 पेक्षा जास्त विविध प्रकारचे स्वयंप्रतिकार रोग आहेत जे शरीराच्या कोणत्याही भागावर परिणाम करतात. त्यामुळे निदान अवघड होते. या ८० रोगामध्ये GBS चा समावेश आहे.
डॉ वावरे यांनी पुढे सांगितले कि, जीबीएस हा एक स्वयंप्रतिकार रोग आहे ज्यामध्ये परिधीय मज्जातंतू आणि मज्जातंतूंच्या मुळांना रोगप्रतिकारक प्रणालीच्या ऍन्टीबॉडीज आणि लिम्फोसाइट्समुळे नुकसान होते.
GBS साठी सर्वात सामान्य जोखीम घटकांपैकी एक म्हणजे कॅम्पिलोबॅक्टर जेजुनी या बॅक्टेरियाचा संसर्ग , ज्यामुळे गॅस्ट्रोएन्टेरिटिस होतो (मळमळ, उलट्या आणि अतिसारासह). काहीवेळा, शस्त्रक्रिया सिंड्रोम ट्रिगर करेल.
ही एक स्वयंप्रतिकार स्थिती आहे, ज्यामध्ये शरीराची रोगप्रतिकारक शक्ती स्वतःच्या नसांवर हल्ला करते आणि नुकसान करते. अनेक श्वसन किंवा गॅस्ट्रोइंटेस्टाइनल इन्फेक्शनमुळे जीबीएस होऊ शकते परंतु ही स्थिती एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीमध्ये पसरू शकत नाही, म्हणजे हा सांसर्गिक नाही. असे डॉ वावरे यांनी सांगितले.
डॉ वावरे यांनी पुढे सांगितले कि, GBS हा विषाणू नाही किंवा जीवाणू देखील नाही. हा एक सिंड्रोम आहे. आता आपण सिंड्रोम म्हणजे काय ते समजून घेऊया. एकाच वेळी घडून येणार्या ठराविक प्रकारच्या गोष्टींचा गट म्हणजे Syndrome.
पुण्यात काही भागात ठराविक कालावधी करता हा आजार राहणार आहे. आमच्याकडे फक्त सिंहगड रोड याच परिसरातील पेशंट येत नाहीत, तर हडपसर, धनकवडी, अशा भागातून देखील पेशंट येत आहेत. म्हणजे फक्त पाण्यामुळे होणारा किंवा हा जलजन्य आजार नाही. याचे खूप पैलू आहेत. एखाद्या निरोगी असणाऱ्या व्यक्तीला देखील हा आजार होऊ शकतो. स्वत:चीच प्रतिकारशक्ती जेव्हा स्वतःच्या विरोधात जाऊन काम करते, तेव्हा हा आजार होतो. कदाचित कुणाला रुटीन वायरल झाले असेल आणि हा आजार उद्भवला असेल तर ते एक फक्त निमित्त मानता येते. मात्र याच कारणामुळे हा आजार झाला. असे मानता येत नाही.
डॉ वावरे पुढे सांगतात कि, चांगले पाणी पिणे, चांगला आहार करणे, या गोष्टी महत्वाच्या आहेतच. पण याचा जो बाऊ केला आहे कि हा फक्त पाण्यामुळे होतो, ते मात्र चुकीचे आहे. हा प्रतिकारशक्ती शी संबंधित आजार आहे. तो लहान मुलांपासून ते वृद्ध अशा सगळ्यांना होऊ शकतो. आणि तो आताच आला असे नाही. मागील वर्षी GBS च्या १९५ केसेस पुण्यात सापडल्या होत्या. मृत्यू नगण्य होते. याला दुर्लक्षित करावे. असा हा आजार आहे. त्यामुळे याला न घाबरता सतर्क राहावे. असे आवाहन डॉ वावरे यांनी पुणेकरांना केले आहे.
COMMENTS