Bogus Doctor Meeting PMC | समाविष्ट गावातील बोगस डॉक्टर शोधण्यासाठी महापालिका आरोग्य विभागाची मोहीम!

Homeadministrative

Bogus Doctor Meeting PMC | समाविष्ट गावातील बोगस डॉक्टर शोधण्यासाठी महापालिका आरोग्य विभागाची मोहीम!

Ganesh Kumar Mule Jan 25, 2025 6:29 PM

CHS Portal | PMC Health Service | अंशदायी वैद्यकीय योजनेचे संगणकीकरण! | महापालिका कर्मचाऱ्यांना CHS कार्ड साठी पोर्टलवर माहिती भरण्याचे आदेश
PMC Additional Commissioner | पुणे महापालिका अतिरिक्त आयुक्त पदासाठी नाव डावलल्याबाबत रमेश शेलार यांची राज्याच्या प्रधान सचिवांकडे तक्रार
Holidays in New Year | PMC Pune | आगामी वर्षासाठी (2023) महापालिका कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना सुट्ट्या जाहीर

Bogus Doctor Meeting PMC | समाविष्ट गावातील बोगस डॉक्टर शोधण्यासाठी महापालिका आरोग्य विभागाची मोहीम!

PMC Health Department – (The Karbhari News Service) – पुणे महापालिका हद्दीत (PMC Limits) नवीन समाविष्ट झालेल्या गावांमधील (Merged Villages) बोगस डॉक्टर (Bogus Doctors) शोधण्याबाबत महापालिकेने हालचाली सुरू केल्या आहेत. नोंदणीकृत डॉक्टरांची माहिती संकलित करण्यासाठी ३१ मार्च पर्यंत मोहीम राबवण्याचे आदेश महापालिका अतिरिक्त आयुक्त यांनी दिले आहेत. (Pune Municipal Corporation – PMC)

बोगस डॉक्टर शोध समितीची बैठक

महापालिकेत अतिरिक्त आयुक्त यांच्या अध्यक्षते खाली बोगस डॉक्टर शोध समितीची बैठक झाली. यावेळी विविध निर्णय घेण्यात आले. गेले कित्येक दिवस या समितीची बैठक झाली नव्हती. या बैठकीत समाविष्ट गावातील बोगस डॉक्टरांचा शोध घेण्यावर चर्चा झाली. अतिरिक्त आयुक्तांनी सद्यस्थितीत काम करणाऱ्या आणि नोंदणीकृत असणाऱ्या डॉक्टरांचे कार्ड भरून घेण्याचे आदेश दिले. ही मोहीम ३१ मार्च पर्यंत राबवली जाणार आहे. तसेच बोगस डॉक्टरांचा शोध घेऊन कारवाई करण्याचे आदेश देखील अतिरिक्त आयुक्तांनी दिले.

विधी विभागाचा घ्यावा लागणार अभिप्राय

बैठकीत अतिरिक्त आयुक्तांनी आदेशीत केले कि, बोगस डॉक्टर वर गुन्हे दाखल करण्याचे प्रस्ताव समिती मधे न आणता विधी विभागाचा अभिप्राय घेऊन क्षेत्रीय कार्यालय स्तरावर गुन्हे दाखल करावेत. तसेच दाखल प्रस्तावावर त्वरित कार्यवाही करण्यासाठी विधी विभागाने नोडल अधिकारी म्हणून अनुभवी वकिलाची निवड करावी. तसेच कायदेशीर बाबीची पूर्तता करण्यासाठी विभागाने संबंधित नोडल अधिकारी यांना मदत करावी. असे देखील आदेश देण्यात आले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0