Pune Water Cut | येत्या गुरुवारी शहराच्या पूर्व भागातील पाणीपुरवठा पूर्णतः राहणार बंद!

Homeadministrative

Pune Water Cut | येत्या गुरुवारी शहराच्या पूर्व भागातील पाणीपुरवठा पूर्णतः राहणार बंद!

Ganesh Kumar Mule Jun 15, 2026 8:08 PM

Loudspeaker during Ganeshotsav | गणेशोत्सवात हे ५ दिवस ध्वनिक्षेपक वापरासाठी असेल परवानगी
Pune Water Cut on Thursday | येत्या गुरुवारी शहराच्या या भागातील पाणीपुरवठा राहणार बंद! 
Women Toilet | PMC Bibwewadi Ward Office | महर्षी नगर परीसरात महिलांसाठी नवीन शौचालय ची व्यवस्था करा | योगिता सुराणा यांची महापालिका प्रशासनाकडे मागणी 

Pune Water Cut | येत्या गुरुवारी शहराच्या पूर्व भागातील पाणीपुरवठा पूर्णतः राहणार बंद!

| विमाननगरसह अनेक भागात 2 दिवस पाणी टंचाई

 

PMC Water Supply – (The Karbhari News Service) –  विश्रांतवाडी चौक येथे उभारण्यात येणाऱ्या ग्रेड सेपरेटर/उड्डाणपुलाच्या कामामुळे 600 मि.मी. व्यासाची जलवाहिनी स्थलांतरित करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. या कामासाठी गुरुवार, 18 जून  रोजी पुण्याच्या पूर्व भागातील अनेक भागांचा पाणीपुरवठा पूर्णतः बंद ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिली आहे. (Pune Water Supply)

पाणीपुरवठा विभागाचे प्रभारी अधीक्षक अभियंता विरेंद्र केळकर यांनी जारी केलेल्या निवेदन नुसार, 18 जून रोजी होणाऱ्या या कामामुळे खालील भागांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे:

या भागात पाणीपुरवठा बंद राहील:

गणेशनगर, कळस, म्हस्के वस्ती, जाधव वस्ती, माळवाडी, वडारवाडी, संजयपार्क, बर्माशेल, विमाननगरचा काही भाग, विश्रांतवाडी मधील एअरपोर्ट रस्त्याचा काही भाग, नगर रोडवरील श्रीपार्क व पराशर सोसायटी, इत्यादी परिसर

प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, 17 आणि 19 जून रोजी या भागात नेहमीप्रमाणे पाणीपुरवठा होणार आहे. मात्र 18 जून रोजी पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील. त्यानंतर 20 जून  पासून सम-विषम तारखेनुसार पुन्हा पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येणार आहे.

महापालिका प्रशासनाने नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आणि या कालावधीत सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. उड्डाणपुलाच्या कामासाठी ही जलवाहिनी स्थलांतरित करणे आवश्यक असल्याने हा निर्णय घ्यावा लागला असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0